'रात्रीस खेळ चाले'मधील प्रसिद्ध अभिनेत्याचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 13:34 IST2022-10-28T13:25:55+5:302022-10-28T13:34:33+5:30
‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath ) ही प्रेक्षकांची आवडती मालिका. आता या मालिकेत रात्रीस खेळ चाले मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे.

'रात्रीस खेळ चाले'मधील प्रसिद्ध अभिनेत्याचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत
‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath ) ही प्रेक्षकांची आवडती मालिका. ही मालिका सुरू झाली आणि अल्पावधीत या मालिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं. मालिकेतील प्रार्थना बेहरे ( Prarthana Behere) व श्रेयस तळपदेची (Shreyas Talpade) रोमॅन्टिक केमिस्ट्रीही तुफान हिट ठरली.
इतकी की, ही बंद झालेली मालिका लोकांच्या आग्रहास्तव पुन्हा सुरू करण्यात आली. पण आता या मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. यशचं गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि यश व नेहाचा मोठा अपघात होतो. या अपघातात नेहा कारमधून खाली दरीत पडते. तर, यश जखमी होतो. या अनपेक्षित ट्विस्टनंतर काही दिवस नेहा मालिकेतून गायब होती.
आता ती पुन्हा एकदा मालिकेत परतली आहे. अर्थात नेहा म्हणून नाही तर अनुष्का बनून. मालिकेत नुकतीच अनुष्काची एन्ट्री झाली ह्यात प्रार्थनाचा बदललेला लुक प्रेक्षकांना पाहायला मिळतो. आता या मालिकेत जयंतीलाल मेहेताची एन्ट्री झाली आहे. जयंतीलाल मेहेता हे अनुष्काचे बाबा आहेत. ते एक बिझनेसमन आहेत. जयंतीलाल मेहेताचा भूमिकेत रात्रीस खेळ चाले मालिकेत अण्णा नाईकांची भूमिका गाजवणारे जेष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर असणार आहेत. आता जयंतीलाल यांच्या येण्याने यशच्या आयुष्यात काय घडणार हेच बघणं औत्सुक्याच ठरणार आहे.