‘रात्रीस खेळ चाले २’ वच्छीचा डान्स होतोय पॉप्युलर, पाहा Video

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:30 IST2019-04-08T06:30:00+5:302019-04-08T06:30:00+5:30

‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेत वच्छीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटील अल्पावधीतच लोकप्रिय झाली. नकारात्मक भूमिका असलेली वच्छीची व्यक्तिरेखा अगदी खरी वाटावी इतक्या सहजपणे संजीवनी ती साकारते.

Ratris Khel Chale 2 THis Video Viral On Social Media | ‘रात्रीस खेळ चाले २’ वच्छीचा डान्स होतोय पॉप्युलर, पाहा Video

‘रात्रीस खेळ चाले २’ वच्छीचा डान्स होतोय पॉप्युलर, पाहा Video

‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कुठलंही प्रथितयश कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा घराघरांत लोकप्रिय ठरल्या. ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेत वच्छीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटील अल्पावधीतच लोकप्रिय झाली. नकारात्मक भूमिका असलेली वच्छीची व्यक्तिरेखा अगदी खरी वाटावी इतक्या सहजपणे संजीवनी ती साकारते.

वच्छीच्या व्यक्तिरेखेसोबतच तिचा डान्स देखील तितकाच लोकप्रिय होत आहे. स्वतःच्या मुलाच्या, काशीच्या वरातीत वच्छीचा डान्स सर्व प्रेक्षकांनी पाहिला आणि सगळ्यांना आवडला देखील. मालिकेतील शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती वच्छी सोबत वच्छीचा डान्स करतेय. हा व्हिडीओ प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला आहे. नेटिझन्सनी या व्हिडिओला भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अगदी कमी वेळातच या व्हिडिओला ५० हजारापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. वच्छीचा डान्स खूप पॉप्युलर होतोय इतकं मात्र नक्की.

रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत नुकतेच दत्ताचे लग्न झालेले आपल्याला पाहायला मिळाले. सरिता ही अतिशय गरीब कुटुंबातील असून अण्णांनी आपल्या स्वार्थासाठी तिचे आणि दत्ताचे लग्न करून दिले आहे. सरिताचे लग्न झाल्यानंतर आता पाच परतावनाचा कार्यक्रम सुरू आहे. सरिता ही अतिशय साधी असून नेहमीच साड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या मालिकेत सरिता ही भूमिका प्राजक्ता वाडिये ही अभिनेत्री साकारत आहे. सरिता ही मालिकेत नेहमीच भारतीय पेहरावात आपल्याला पाहायला मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का, खऱ्या आयुष्यात प्राजक्ताला भारतीय कपड्यांसोबत पाश्चिमात्य कपडे देखील परिधान करायला आवडतात. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिनेच तिच्या फेसबुकच्या अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर हीच सरिता आहे का प्रश्न सगळ्यांना पडत आहे. प्राजक्ताचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 
 

Web Title: Ratris Khel Chale 2 THis Video Viral On Social Media