रतन राजपूतचा अभिनयाला रामराम? अभिनेत्रीने पहिल्यांदा दिले यावर उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 15:11 IST2022-07-20T15:07:46+5:302022-07-20T15:11:38+5:30
शेती करतानाचा एक व्हिडिओही समोर आला होता. जे पाहून लोक स्वतःचा अंदाज बांधत आहेत.आता रतनने या उडणाऱ्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.

रतन राजपूतचा अभिनयाला रामराम? अभिनेत्रीने पहिल्यांदा दिले यावर उत्तर
'अगले जनम मोहे बिटिया ही कीजो' या सुपरहिट शोमधून लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री रतन राजपूत बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यावरुन गायब आहे. २०२०-२१ पासून ती छोट्या पडद्यावर झळकलीच नाही. मालिका तर सोडाच कोणत्याही पुरस्कार सोहळे आणि पार्टीत ती दिसली नाही.तर दुसरीकडे रतनचे चाहते तिच्या कमबॅकची वाट पाहात आहेत.मात्र आता चाहत्यांची चांगलीच निराशा होणार आहे असेच दिसतंय. रतनने आता एक्टींग करिअरलाच बाय बाय केल्याचे वृत्त आहे. रतनही आता ब्लॉगिंग आणि शेती करून उदरनिर्वाह करत आहे. अभिनय क्षेत्रात तिलाही फारस सर उरला नसल्याचे दिसतंय.सध्या तिचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता रतनने या वृत्तांवर प्रतिक्रिया देत सत्य उघड केले आहे.
कोरोनामुळे केवळ देशालाच नाही तर अख्या जगाला चांगलाच फटका बसला आहे. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. याचा सर्वाधिक फटका खऱ्या कलाकारांवर पडला असून रतन राजपूतचेही नाव या यादीत येते.अभिनेत्री म्हणते की, कोरोनापासून तिला काम मिळणे बंद झाले आहे. त्यानंतर अभिनय सोडल्याच्या बातम्या सतत येत आहेत.
दरम्यान, शेती करतानाचा एक व्हिडिओही समोर आला होता. जे पाहून लोक स्वतःचा अंदाज बांधत आहेत.आता रतनने या उडणाऱ्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. रतन म्हणाली "कृपया अशा बातम्या पसरुवू नका...मी अभिनय सोडला नाही. अभिनय करत असताना शेती करता येत नाही का? असो, माझ्याकडे शेतीसाठी जमीन नाही.मी इतरांच्या शेतात काम करते. कारण ती माझी आवड आहे. मला मातीशी जोडून राहायला आवडते.
कामाबद्दल बोलताना रतन राजपूतने सांगितले की ती पुढच्या वर्षी टेलिव्हिजन शो करणार आहे. अभिनेत्रीने सांगितले की, सध्या ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार्या मालिका आणि चित्रपटांमध्ये बिझी आहे. आगामी काळात मालिका करायची आहे. व्हिडीओच्या शेवटी रतन निर्मात्याकडे काम मागते आणि म्हणते की मला काम द्या. यावर रतन राजपुतला कामाच्या संधी उपलब्ध होतील की नाही हे तर वेळच ठरवेल.