Big Boss 13 : या व्यक्तिने केले होते सहकलाकारासोबत लग्न, पुढे घडले असे काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 14:46 IST2020-02-13T14:41:34+5:302020-02-13T14:46:52+5:30
मीडियामध्ये या दोघांच्या घटस्फोटाची खूप चर्चा झाली

Big Boss 13 : या व्यक्तिने केले होते सहकलाकारासोबत लग्न, पुढे घडले असे काही
रश्मी देसाई ही 'बिग बॉस 13'च्या घरातील स्ट्राँग कंटेस्टेंट मानली जाते. घरात गेल्यापासून रश्मीच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. रश्मीने बिग बॉस 13च्या टॉप 5 मध्ये आपली जागा तायर केली. आज रश्मीचा वाढदिवस आहे. रश्मीचे आयुष्य कदाचित खुल्या पुस्तकासारखे दिसेल. परंतु तिच्या या रिअल लाईफ स्टोरीत बरीच रहस्ये दडलेली आहेत.
रश्मी देसाई हे टीव्ही जगातील एक मोठे नाव आहे. पण तिच्या अॅक्टिंग लाईफपेक्षा ती कायम तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढउतार आले आहेत. 2012 मध्ये तिने अभिनेता आणि सहकलाकार नंदीश संधूसोबत लग्न केले होते. केवळ 1 वषार्नंतरच त्यांच्या विवाहित आयुष्यातील कुरबुरीच्या बातम्या येऊ लागल्या. आधी दोघांनीही या बातम्या नाकारल्या. पण पुढे एकत्र राहणे कठीण झाले आणि लग्नाच्या चार वर्षांनंतर रश्मी व नंदीश विभक्त झालेत.
मीडियामध्ये या दोघांच्या घटस्फोटाची खूप चर्चा झाली. रश्मीने नंदिशचे अनेक मुलींसोबत असलेल्या मैत्रिला घटस्फोटाचे कारण ठरवले होते. तर नंदिशने रश्मीच्या पझेसिव्हनेसचे कारण दिले होते. एका मुलीसोबतचे नंदिशचे फोटो त्यावेळी व्हायरल झाले होते त्यानंतर दोघांचा घटस्फोट नक्की समजला जात होता. अमर उज्जालाच्या रिपोर्टनुसार रश्मी म्हणाली, ''मी कधी घरी सोडण्याचा विचार केला नव्हता. पण मला नेहमी घरातून काढून टाकले जायचे. जर त्यांने या नात्याला 100 टक्के दिले असते तर हे नातं कधीच तुटलं नसतं.'' पुढे ती म्हणाली, मी या नात्यात आनंदी नव्हते. माझे कुटुंबीयसुद्धा चिंतेत होते. मात्र तरीही त्यांनी या निर्णयात माझी साथ दिली.''
रश्मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली आहे. मॉडेलिंगमध्ये तिला कमालीचा इंटरेस्ट होता. उतरन या मालिकेत तिने तपस्याची भूमिका साकारली होती. ही भूमिका नकारात्मक असली तरी या भूमिकेने रश्मीला खरी ओळख दिली. यानंतर फिर कोई है, इश्क का रंग सफेद, दिल से दिल तक, परी हूं मैं या मालिकेत ती दिसली.