राणा दाचा बदलला अंदाज,तुम्हाला कसा वाटला त्याच्या हा नवीन लूक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2017 12:17 IST2017-06-26T06:47:23+5:302017-06-26T12:17:23+5:30
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा पैलवान राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी सध्या रसिकांच्या मनावर गारुड घालत आहे.मालिकेत दिसणारा राणाने आता ...

राणा दाचा बदलला अंदाज,तुम्हाला कसा वाटला त्याच्या हा नवीन लूक?
' ;तुझ्यात जीव रंगला' मालिकेचा पैलवान राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी सध्या रसिकांच्या मनावर गारुड घालत आहे.मालिकेत दिसणारा राणाने आता त्याच्या लूकमध्ये थोडा बदल केला आहे. आता तो अधिक स्टायलिश दिसू लागल्यामुळे इतर मुलीही त्याच्या भोवती गराडा घालत असल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे.मात्र राणा दाचा लूकमुळे अंजली बाईंना मात्र त्रास होतोय.सतत मुलींच्या गराड्यात दिसणा-या राणाचा लूक तर भावलाय मात्र सतत मुलींच्या गराड्यात राणा दिसत असल्यामुळे अंजली बाईंना या थोडा मानसिक त्रास सहन करावा लागतोय.हे तर झाल रिल लाईफचं मात्र रिअल लाईफमध्ये राणा या भूमिकेमुळे हार्दिकचे खूप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. मालिकेत त्याच्या साध्या सरळ स्वभावामुळे तसाच लाईफ पार्टनर आपल्याला मिळावा अशी इच्छाही अनेक मुली त्याच्या फेसबूकपेजवर व्यक्त करताना दिसतात.राणाचा लूकने तर आणखीनच मुलींना वेड लावल्याचे पाहायला मिळतंय.गॉगल लावलेला राणा रूबाबदार दिसत असल्यामुळे त्याला खूप सा-या मिळणा-या प्रतिक्रीयांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे.हार्दिकच्या आत्ताच्या लूकमध्ये आणि पूर्वीच्या लूकमध्ये कमालीचा फरक जाणवतोय. त्याने स्वत:च्या फिटनेसवरही खूप मेहनत घेतली. त्याच्या डॅशिंग लूकमुळे सगळ्यांची मनं जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे.घराघरांत आज राणा आणि अंजली रसिकांचे आपल्या अभिनयाने तुफान मनोरंजन करतायेत.राणा प्रमाणेच अंजलीच्या भूमिकेलाही रसिकांचे पसंती मिळतेय.दोघांच्या रोमँटीक केमिस्ट्रीमुळे आणि आयुष्यात येणारे समस्यांचे निवारण हे दोघे कसे करतात हे ही पाहणे रंजक असल्यामुळे ही मालिका रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहे.