रमण-इशिता पुन्हा अडकणार विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 18:04 IST2016-10-26T18:04:45+5:302016-10-26T18:04:45+5:30
ये है मोहोब्बते या कार्यक्रमातील रमण आणि इशिताची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. शगुनसोबत घटस्फोट झाल्यानंतर इशिता रमणच्या आयुष्यात आल्याचे ...
.jpg)
रमण-इशिता पुन्हा अडकणार विवाहबंधनात
य है मोहोब्बते या कार्यक्रमातील रमण आणि इशिताची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. शगुनसोबत घटस्फोट झाल्यानंतर इशिता रमणच्या आयुष्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. खरे तर सुरुवातीला या दोघांनाही एकमेकांबाबत प्रचंड राग असतो. पण रमणची मुलगी रुही त्यांना एकत्र आणण्यास कारणीभूत ठरते. इशिताला लहानग्या रुहीचा लळा लागतो. त्यामुळे ती रमणशी लग्न करण्याचे ठरवते. तर दुसरीकडे मुलीच्या प्रेमाखातर रमण इशिताशी लग्न करतो. पण सुरुवातीला त्यांच्यात वादविवाद सुरूच असतात. त्या दोघांचे पटेल असे कोणालाच वाटत नसते. पण नंतर ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर त्या दोघांमध्ये निर्माण झालेली केमिस्ट्री हा या कार्यक्रमाचा युएसपी ठरला. पण नंतर त्यांच्या आयुष्यात काही समस्या निर्माण झाल्या आणि त्या दोघांमध्ये दुरावा आला. खरे तर प्रेक्षकांना या दोघांनी नेहमीच एकत्र राहावे असे वाटत होते. पण कथानकानुसार त्यांच्यात दरम्यानच्या काळात ताटातूट झाली होती. पण आता ते दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत आणि एवढेच नव्हे तर दोघे पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्याच दिवशी ते दोघे लग्न करणार आहेत. या लग्नाला भल्ला कुटुंबातील तसेच इशिताच्या कुटुंबातील सगळी मंडळी असणार आहेत. अतिशय मजेत, खेळकर वातावरणात हे लग्न संपन्न होणार आहे. पण त्याचसोबत त्यांच्या लग्नाला काही खास पाहुणेदेखील हजेरी लावणार आहेत. बॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा दोघांच्या लग्नाला येणार असून या दोघांना त्यांच्या सदिच्छा देणार आहेत. ते ए दिल है मुश्किल या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या मालिकेत येणार आहेत.