'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेतील राजवीर - मयूरी जाणार टिटवाळा गणपतीच्या दर्शनाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 04:25 PM2023-09-18T16:25:03+5:302023-09-18T16:25:15+5:30

'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेतील राजवीर आणि मयूरी यांची हटके जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Rajveer - Mayuri from the series 'Abol Preetichi Ajab Kahani' will go to Titwala for Ganpati's darshan. | 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेतील राजवीर - मयूरी जाणार टिटवाळा गणपतीच्या दर्शनाला

'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेतील राजवीर - मयूरी जाणार टिटवाळा गणपतीच्या दर्शनाला

googlenewsNext

सोनी मराठी वाहिनी वरील 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेतील राजवीर आणि मयूरी यांची हटके जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. गणेशोत्सवात राजवीर सराफ याच्या घरचे टिटवाळा येथील पुरातन कालीन सिद्धिविनायक महागणपती मंदिरात दरवर्षी दर्शनासाठी जातात. शकुंतला आणि दुष्यंत यांच्या प्रेमाचा एकमेव साक्षीदार असलेल्या या महागणपतीस विवाहविनायक असे म्हटले जाते.

 यंदा राजवीर देखील आपल्या कुटुंबासोबत महागणपतीच्या दर्शनाला जाणार आहे; आणि राजवीर सोबत भाऊसाहेब म्हणजे बॉडीगार्ड देखील जातो. मात्र, मनोमन राजवीरला मयूरी आपल्या सोबत असती तर कीती छान झाल असतं ? असा विचार करतो. तेव्हा असं काहीतरी तरी घडतं की भाऊसाहेब वेश बदलून मयूरीच्या वेशात येतो, अन् राजवीर आणि मयूरी दोघेजण एकत्र या गणपतीच्या दर्शनाला जातात. राजवीर - मयूरी एकत्र गणपतीच्या दर्शनाला गेल्यावर नक्की काय होतं? मालिकेत पुढे काय होणार? आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने  मयूरी आणि राजवीर एकत्र येतील का?  हे जाणून घेण्यासाठी 'अबोल प्रीतीची अजब कहाणी'. सोमवार ते शनिवारी, संध्या. ७.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.

 प्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव राजवीर आहे. त्याच्याबरोबर गुणी अभिनेत्री जान्हवी तांबट हीसुद्धा या मालिकेतून विशिष्ट व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळते आहे.  तिच्या व्यक्तिरेखेचं नाव मयूरी असून ती या मालिकेत बॉडीगार्डच्या वेशातसुद्धा  पाहता येणार आहे. आता या दोघांची अजब प्रेमकहाणी कशी असेल, हे लवकरच पाहायला मिळेल. ही 'अबोल प्रीतीची अजब कहाणी'  कशी लपूनछापून फुलतेय, हे पाहायला मिळेल.

Web Title: Rajveer - Mayuri from the series 'Abol Preetichi Ajab Kahani' will go to Titwala for Ganpati's darshan.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.