Raju Srivastava's son Aayushmaan : राजू श्रीवास्तव यांच्या मुलाचं टॅलेंट पाहून भारावले प्रेक्षक, तुम्हीही कराल कौतुक; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 02:14 PM2023-01-25T14:14:59+5:302023-01-25T14:17:32+5:30

Raju Srivastava's son Aayushmaan : ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स 9’च्या फिनालेमध्ये राजू श्रीवास्तवच्या मुलाचीच चर्चा...

Raju Srivastava's son Aayushman in Sa Re Ga Ma Pa Li'l Champs playing Sitar | Raju Srivastava's son Aayushmaan : राजू श्रीवास्तव यांच्या मुलाचं टॅलेंट पाहून भारावले प्रेक्षक, तुम्हीही कराल कौतुक; पाहा VIDEO

Raju Srivastava's son Aayushmaan : राजू श्रीवास्तव यांच्या मुलाचं टॅलेंट पाहून भारावले प्रेक्षक, तुम्हीही कराल कौतुक; पाहा VIDEO

googlenewsNext

Raju Srivastava's son Aayushmaan : प्रेक्षकांना खळखळून हसवणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव आज आपल्यात नाहीत. ट्रेडमिलवर धावता धावता राजू खाली कोसळले. त्यांना हदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांची प्राणज्योत मालवली.  २१ सप्टेंबर २०२२ ला राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू यांच्या जाण्यानं चाहते हळहळले. राजू कॉमेडीच्या जगातील बादशाह होते. सध्या त्यांच्या मुलाची चर्चा आहे. होय, वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा आयुष्यमान श्रीवास्तव मनोरंजन क्षेत्रात बाबाचं नाव मोठं करू इच्छित आहे. नुकतंच सा रे ग म प लिटिल चॅम्प्स च्या मंचावर आयुष्यमानने सगळ्यांनाच जिंकलं. सा रे ग म प लिटिल चॅम्प्सच्या फिनालेमध्ये आयुष्यमानचं सतारवादन ऐकून प्रत्येकजण मंत्रमुग्ध झाला.

आयुष्यमान एक उत्कृष्ट सतारवादक आहे. आयुष्यमान सतारवादनाचे अनेक कार्यक्रम करत असतो. अलीकडेच लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम शो सा रे ग मा प लिल चॅम्प्स 9 च्या फिनालेमध्ये त्याने सतारवादन केलं. आयुष्यमानने याचा खास व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर केलाय. राजू श्रीवास्तव यांच्या अधिकृत पेजवरही हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. 

आयुष्यमानने बालपणापासून संगीताची आवड जोपासली. आज इतक्या कमी वयात आयुष्यमानने  संगीतक्षेत्रात स्वतःच नाव निर्माण केलंय. राजू श्रीवास्तव असते तर त्यांनाही आपल्या मुलाचा  अभिमान वाटला असता. सध्या आयुष्यमानच्या या उपलब्धीबद्दल सर्व स्तरातून त्याचं कौतुक होत आहे. चाहत्यांनीही आयुष्यमानला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.  

Web Title: Raju Srivastava's son Aayushman in Sa Re Ga Ma Pa Li'l Champs playing Sitar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.