रजत टोकसचे चंद्रनंदिनी या मालिकेतील तनू खानसोबत अफेअर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 11:39 IST2017-04-22T06:09:58+5:302017-04-22T11:39:58+5:30
रजत टोकस धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान या मालिकेमुळे नावारूपाला आला. या मालिकेत त्याने साकारलेली पृथ्वीराज चौहान ही ...

रजत टोकसचे चंद्रनंदिनी या मालिकेतील तनू खानसोबत अफेअर?
र त टोकस धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान या मालिकेमुळे नावारूपाला आला. या मालिकेत त्याने साकारलेली पृथ्वीराज चौहान ही भूमिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर धर्म वीर, जोधा अकबर यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला. सध्या चो चंद्र नंदिनी या मालिकेत चंद्रगुप्त मौर्य ही भूमिका साकारत असून त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. रजत सध्या त्याच्या कामामुळे नव्हे तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
एकता कपूरच्या चंद्रनंदिनी या मालिकेत श्वेता बासू प्रसाद ही रजतची नायिका आहे. तसेच या मालिकेत हेलेना हीदेखील त्याची पत्नी असल्याचे दाखवण्यात आले आहे. हेलेना ही भूमिका तनू खान साकारत आहे. सध्या रजन तनूसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत असल्याची चर्चा आहे.
रजतने 2015मध्ये सृष्टी नय्यरसोबत लग्न केले. सृष्टी हीदेखील अभिनेत्री असून ती नाटकांमध्ये काम करते. अनेक वर्षांच्या अफेअरनंतर रजत आणि सृष्टी यांनी लग्न केले होते. पण सध्या तो त्याच्या पत्नीसोबतच नव्हे तर तनूसोबत जास्त वेळ घालवत आहे.
मालिकेच्या सेटवर तर ते दोघे सतत एकमेकांसोबत असतात. तसेच चित्रीकरणाच्या दरम्यान ते एकमेकांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये वेळ घालवतात. पॅकअपनंतरदेखील ते एकमेकांसोबत फिरायला जातात असे म्हटले जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ते दोघे नाइट आऊटसाठीदेखील गेले असल्याची चर्चा आहे.
रजत एक सेलिब्रेटी असला तरी त्याचे वैयक्तिक आयुष्य मीडियापासून दूर ठेवणेच तो पसंत करतो. त्यामुळे तो त्याच्या पत्नीसोबतचे फोटोदेखील सोशल नेटवर्किंगला कधीच पोस्ट करत नाही. पण आता त्याच्या या अफेरअरच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.