राजन साहीच्या मालिकेत मोहित मलिक आणि अरहान बहल साकारणार प्रमुख भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 15:51 IST2017-01-23T10:21:43+5:302017-01-23T15:51:43+5:30
राजन साही यांची निर्मिती असलेली ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ...

राजन साहीच्या मालिकेत मोहित मलिक आणि अरहान बहल साकारणार प्रमुख भूमिका
र जन साही यांची निर्मिती असलेली ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका टीआरपीच्या रेसमध्येदेखील अव्वल आहे. या मालिकेतील अक्षरा आणि नैतिक या व्यक्तिरेखा तर प्रचंड गाजल्या. या दोघांनी मालिका सोडल्यानंतर या मालिकांच्या टीआरपीवर परिणाम होईल असे अनेकांना वाटत होते. पण याचा मालिकेच्या टीआरपीवर काहीच फरक पडला नाही.
आता ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचे निर्माते राजन साही एक नवी मालिका घेऊन येत असून या मालिकेचा जेनर हा पूर्णपणे वेगळा असणार आहे. ये रिश्ता क्या कहताला है या मालिकेप्रमाणे ही कौटुंबिक मालिका नसून एक थ्रिलर मालिका असणार आहे. आयुष्यात घडलेल्या एका गोष्टीचा बदला घेण्याची कथा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
![arhaan behl photos]()
या मालिकेत छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध अभिनेते अरहान बहल आणि मोहित मलिक प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. ही मालिका एका तुर्किश मालिकेवर आधारली असून या मालिकेत लहानपणापासून अतिशय घनिष्ठ मैत्री असलेल्या चार मित्रांची कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील कलाकारांची निवड झाली असून या मालिकेचे चित्रीकरण पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे.
मोहितने याआधी डोली अरमानो की या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती तर अरहान बहलच्या प्रतिज्ञा, अशोका, दो दिल बंधे एक डोरी से यांसारख्या मालिका चांगल्याच गाजल्या होत्या.
अरहान आणि मोहितसारखे कसदार अभिनेते एकाच मालिकेत असल्याने या मालिकेविषयी प्रेक्षकांन चांगलीच उत्सुकता लागलेली आहे.