साखरपुड्यानंतर शिवानी सोनारने चाहत्यांना दिली गुडन्यूज, दिसणार नव्या भूमिकेत; शेअर केला सेटवरील व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 11:55 AM2024-04-16T11:55:10+5:302024-04-16T11:55:36+5:30

'राजा राणीची गं जोडी' फेम शिवानी सोनार दिसणार नव्या भूमिकेत, शेअर केला सेटवरील व्हिडिओ

raja ranichi ga jodi fame shivani sonar to be seen in man mandira gajar bhakticha | साखरपुड्यानंतर शिवानी सोनारने चाहत्यांना दिली गुडन्यूज, दिसणार नव्या भूमिकेत; शेअर केला सेटवरील व्हिडिओ

साखरपुड्यानंतर शिवानी सोनारने चाहत्यांना दिली गुडन्यूज, दिसणार नव्या भूमिकेत; शेअर केला सेटवरील व्हिडिओ

'राजा राणीची गं जोडी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार. या मालिकेत संजिवनी ही भूमिका साकारून शिवानी प्रसिद्धीझोतात आली. राजा राणीची गं जोडी मालिकेतील संजीवनी-रणजित ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेने शिवानीला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. तिच्या चाहत्या वर्गातही भर पडली. 

शिवानी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते. राजा राणीची गं जोडी मालिकेनंतर शिवानी 'सिंधुताई माझी माई' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या मालिकेत शिवानी सिंधुताई सकपाळ यांची भूमिका साकारत आहे. याबरोबरच आता शिवानी आणखी एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. सेटवरील BTS व्हिडिओ शेअर करत शिवानीने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. 

शिवानी झी टॉकीजवरील 'मन मंदिरा गजर भक्तीचा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत ती स्क्रिप्ट वाचताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवानीने एक गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. शिवानीने अभिनेता अंबर गणपुळेशी साखरपुडा केला. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. लवकरच विवाहबंधनात अडकून ते नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत. 

Web Title: raja ranichi ga jodi fame shivani sonar to be seen in man mandira gajar bhakticha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.