टप्पूने का सोडला 'तारक मेहता' शो? अखेर सांगितलं कारण, म्हणाला- "मला करिअरमध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 11:15 AM2024-04-20T11:15:37+5:302024-04-20T11:15:57+5:30

"...म्हणून मी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडली", टप्पूने स्पष्टच सांगितलं

raj anadkat aka tappu revealed why he left tarak mehta ka ooltah chasmah | टप्पूने का सोडला 'तारक मेहता' शो? अखेर सांगितलं कारण, म्हणाला- "मला करिअरमध्ये..."

टप्पूने का सोडला 'तारक मेहता' शो? अखेर सांगितलं कारण, म्हणाला- "मला करिअरमध्ये..."

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्हीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेत टप्पूची भूमिका साकारून अभिनेता राज अनादकट घराघरात पोहोचला. टप्पूच्या भूमिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. पण, अचानक टप्पूने मालिकेतून एक्झिट घेतली होती. आता इतक्या दिवसांनी पहिल्यांदाच त्याने यामागचं कारण सांगितलं आहे. 

राज अनादकटने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने प्रसिद्धीच्या शिखरावर असताना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोडण्यामागचं कारणही सांगितलं आहे. "तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये काम करण्याचं अनुभव अद्भुत होता. मी शोमध्ये खूप काही शिकलो. माझ्याकडे या मालिकेच्या अनेक आठवणी आहेत. माझ्या भावना जोडल्या गेल्या आहेत. या मालिकेमुळे मला खूप काही मिळालं," असं राजने म्हटलं आहे. 

पुढे तो म्हणतो, "माझ्या मनात प्रत्येक वेळेस हाच प्रश्न येतो की मी तारक मेहता ही मालिका का सोडली? मी ५ वर्ष ही मालिका केली. जवळपास १ हजार एपिसोडमध्ये मी होतो. हा प्रवास खूप छान होता. पण, मला इतरही भूमिका करायच्या होत्या. मला स्वत:मध्ये आणि करिअरमध्ये वाढ झालेली प्रगती झालेली बघायची होती. म्हणूनच मी तारक मेहता सोडून नवीन भूमिकांसाठी प्रयत्न करण्याचं ठरवलं. मला टप्पू म्हणून तुम्ही खूप प्रेम दिलं. त्यासाठी मी आभारी आहे. मी लवकरच एका नव्या भूमिकेतून तुमच्या भेटीला येणार आहे." 

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून टप्पू बनून घराघरात पोहोचलेल्या राज अनादकटने बालकलाकार म्हणूनच काम करायला सुरुवात केली होती. ८-९ वर्षांचा असल्यापासूनच तो या इंडस्ट्रीत कार्यरत आहे. २१ वर्षांचा असताना त्याला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेची त्याला ऑफर मिळाली होती. 
 

Web Title: raj anadkat aka tappu revealed why he left tarak mehta ka ooltah chasmah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.