लव्ह लग्न लोचामध्ये जुळणार राघव आणि काव्याचे नाते
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 10:10 IST2017-05-23T04:40:52+5:302017-05-23T10:10:52+5:30
लव्ह लग्न लोचा ही मालिका त्यात सतत होणाऱ्या अनेक लोच्यांमुळे जबरदस्त हिट झाली आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच ...
.jpg)
लव्ह लग्न लोचामध्ये जुळणार राघव आणि काव्याचे नाते
ल ्ह लग्न लोचा ही मालिका त्यात सतत होणाऱ्या अनेक लोच्यांमुळे जबरदस्त हिट झाली आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले आहेत. पण या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. राघव, सुमित, विनय, अभिमान, शाल्मली, काव्या, आकांशा आणि सौम्या या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आजच्या तरुणाईच्या हृदयात एक घर केले आहे. या मालिकेत अभिमान-शाल्मली, विनय-आकांशा, सुमित-सौम्या अशा जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. या मालिकेत राघव आणि काव्या हे दोघेच सिंगल असल्याचे आपण आजवर पाहिले आहे. मात्र हळूहळू यांच्या दोघांमध्येसुद्धा गेल्या काही दिवसांपासून प्रेम फुलू लागले आहे. राघव म्हणजेच विवेक सांगळे आणि काव्या म्हणजेच रुचिता जाधव पूर्वी केवळ एकमेकांशी नुसते भांडायचे असे आपल्याला पाहायला मिळाले होते. मात्र ते आता एकमेकांच्या प्रेमात पडताना दिसत आहेत. एका डान्सच्या कार्यक्रमात राघव आणि काव्याचे नाते जुळणार आहे. या कार्यक्रमाची तयारी करत असतानाच या दोघांचे एकमेकांवरील प्रेम एकमेकांना जाणवणार आहे आणि या कार्यक्रमात हे दोघे मिळून एक उत्कृष्ट डान्स सादर करणार आहेत आणि लवकरच राघव, काव्याच्या नात्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. पण त्याच बरोबर सुमित म्हणजेच ओंकार गोवर्धन आणि सौम्या म्हणजेच अक्षया गुरवचे नाते मात्र कायमचे तुटणार आहे. आता हे सगळे कसे होते हे प्रेक्षकांना काहीच दिवसांत पाहायला मिळणार आहे.
लव्ह लग्न लोचामध्ये सिद्धी कारखानीस, सक्षम कुलकर्णी, ओंकार गोवर्धन, विवेक सांगळे, रुचिता जाधव, अक्षय गुरव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
लव्ह लग्न लोचामध्ये सिद्धी कारखानीस, सक्षम कुलकर्णी, ओंकार गोवर्धन, विवेक सांगळे, रुचिता जाधव, अक्षय गुरव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.