राधे माँच्या दरबारात पोहोचली सपना चौधरी, हाथ जोडून घेतले आशीर्वाद!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 04:33 PM2017-12-19T16:33:27+5:302017-12-19T22:03:27+5:30

सध्या सुरू असलेल्या बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये बघावयास मिळालेली हरियाणवी डान्सर सपना चौधरी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत ...

Radha reached the courtroom of her mother, Sapna Chaudhary, and added blessings to her! | राधे माँच्या दरबारात पोहोचली सपना चौधरी, हाथ जोडून घेतले आशीर्वाद!!

राधे माँच्या दरबारात पोहोचली सपना चौधरी, हाथ जोडून घेतले आशीर्वाद!!

googlenewsNext
्या सुरू असलेल्या बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये बघावयास मिळालेली हरियाणवी डान्सर सपना चौधरी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. नुकतीच ती स्वयंघोषित संत राधे माँ हिला भेटण्यासाठी तिच्या दरबारात पोहोचली होती. समोर आलेल्या फोटोमध्ये सपना राधे माँच्या समोर हाथ जोडून आशीर्वाद घेताना दिसत आहे. सपनाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांकडून त्यावर टीकाही केली जात आहे. 

बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर सपनाने तिच्या बॉलिवूड डेब्यू ‘नानू की जानू’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या शूटिंग सेटवरील आॅन लोकेशन फोटोज् समोर आले होते. फोटोमध्ये सपनाने लाइट ग्रीन अ‍ॅण्ड आॅरेंज रंगाचा पटियाला सूट परिधान केला होता. या चित्रपटात अभिनेते धर्मेंद्र यांचा पुतण्या अभय देओल तिच्या अपोझिट बघावयास मिळणार आहे. सपनाचा हा चित्रपट एक लव्हस्टोरीवर आधारित आहे. यामध्ये सपना व्यतिरिक्त अभिनेत्री पत्रलेखाही बघावयास मिळणार आहे. 



चित्रपटाचे दिग्दर्शन फराज हैदर करीत असून, चित्रपट २०१८ रोजी रिलीज होणार आहे. अभय आणि सपना दोघेही या चित्रमुळे एक्साइटेड आहेत. दरम्यान, सपना चौधरी हिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास खूपच मनोरंजक असा राहिला आहे. यामुळे तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली असून, त्याचा फायदा तिला बॉलिवूड करिअरसाठी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, २५ नोव्हेंबर १९९५ मध्ये सपनाचा दिल्ली येथील महिपालपूर येथे जन्म झाला. तिचे शालेय शिक्षण रोहतक येथे झाले. तिचे वडील एका कंपनीत कार्यरत होते. 



२००८ मध्ये जेव्हा तिच्या वडिलांचे निधन झाले होते, तेव्हा सपना केवळ १२ वर्षांची होती. या वयातच आई नीलम आणि भाऊ बहिणींची जबाबदारी तिच्यावर येऊन ठेपली होती. पुढे सपनाने सिंगिंग आणि डान्सिगमध्ये करिअर केले. अल्पावधीतच ती हरियाणवी डान्सर म्हणून लोकप्रिय झाली. 

Web Title: Radha reached the courtroom of her mother, Sapna Chaudhary, and added blessings to her!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.