राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेचे पूर्ण झाले 200 भाग, अशाप्रकारे केले सेलिब्रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 17:29 IST2018-07-02T16:42:46+5:302018-07-02T17:29:39+5:30

प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेने नुकतेच २०० भाग पूर्ण केले आहेत. मालिकेच्या टीमने सेटवर केक कापून सेलिब्रेशन केले.

Radha Prem Rangi Rangali completes the 200th episode | राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेचे पूर्ण झाले 200 भाग, अशाप्रकारे केले सेलिब्रेशन

राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेचे पूर्ण झाले 200 भाग, अशाप्रकारे केले सेलिब्रेशन

कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका सुरू झाल्यापासूनच मालिकेमध्ये घडणाऱ्या घटना, उत्तम कथानक, कलाकार तसेच आपल्या कुटुंबावर निस्वार्थीपणाने प्रेम करणाऱ्या राधाने आपल्या सोज्वळ स्वभाव आणि नाजूक बोलण्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील, कविता लाड, गौतम जोगळेकर या सगळ्यांनाच प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. सध्या मालिकेमध्ये आलेल्या रंजक वळणाने मालिकेबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली आहे. राधा प्रेमा म्हणून आनंद नाडकर्णी यांच्या रुग्णालयात काम करत आहे. तसेच राधा गरोदर असल्याचे सत्य फक्त माधव निंबाळकर यांना माहिती आहे जे राधानेच सांगितले होते. आता मालिकेमध्ये विश्वनाथ यांनी प्रेमला देवयानीच्या कारस्थानाबद्दल सांगितले आहे. आता पुढे प्रेम कसे देवयानीचे हे कारस्थान मोडून काढेल? कशी राधा आणि प्रेमची भेट होईल? मालिकेमध्ये पुढे कुठले रंजक वळण येणार? हे बघणे रंजक असणार आहे. तसेच कमी कालावधीत यामधील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच या मालिकेने नुकतेच २०० भाग पूर्ण केले आहेत.
या मालिकेतील सर्वच कलाकारांनी २०० एपिसोड पूर्ण झाल्यामुळे मोठ्या उत्साहात सेटवर केक कापला आणि ते एकत्र जेवण देखील जेवले. कलाकारांना झालेला आनंद त्यांच्या फोटोमधून दिसतो आहे. याचबरोबर मालिकेमध्ये येत्या काही भागांमध्ये बरेचसे ट्विस्ट येणार आहेत. जर राधा आणि प्रेमची भेट झाली तर राधाला कळलेले सत्य ती प्रेमला सांगणार का? देवयानी आता कोणती खेळी खेळणार? हे बघणे रंजक असणार आहे.
राधा आणि प्रेम यांची भेट कशी, कधी आणि कुठे होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना राधा प्रेम रंगी रंगली या  मालिककेच्या आगामी भागांमध्येच मिळणार आहेत. या मालिेकेला आता अनेक नवी वळणं मिळणार असून ही वळणं प्रेक्षकांना नक्कीच आवडतील अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 
 

Web Title: Radha Prem Rangi Rangali completes the 200th episode