मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदी अन वैशिष्ठ्यपुर्ण अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे करुन एक काळ गाजविणारे अभिनेते म्हणजे ...
पुष्कर रमला दादांच्या आठवणीत
/> मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदी अन वैशिष्ठ्यपुर्ण अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे करुन एक काळ गाजविणारे अभिनेते म्हणजे दादा कोंडके. त्यांच्या चित्रपटातील गाणी व संवादांनर प्रेक्षकांच्या टाळ््या पडायच्या. अशा या अवलीयाचे असंख्य चाहते आहेतच पण आपेल सेलिब्रिटीज देखील त्यांच्या अभिनयाच्या आजही प्रेमात आहेत. नूकतीच दादा कोंडके यांची १८ पुण्यतिथी झाली. यानिमित्ताने अभिनेता पुष्कर जोग दादांच्या आठवणीत हरवुन गेलेला दिसला. पुष्करने दादां सोबतचा त्याचा फोटो सोशल साईटवर अपलोड केला असुन तो म्हणतोय, रिमेंबरिंग द लिजेंडरी दादा कोंडके. एवढेच नाही तर त्याला े दादांसोबत लहानपणी काम करण्याची संधी देखील मिळाली होती. केवळ पाच वर्षांचा असताना पुष्करने त्यांच्यासोबत काम केले होते. हातात बासरी घेऊन बालकृष्णाच्या रुपात सजलेल्या पुष्करला दादा हातात बासरी घेण्यास शिकवीत असल्याचे फोटोत दिसत आहे. दादांसोबत काम करण्यास, फोटो घेण्यास व त्यांची एक झलक पाहण्यास प्रेक्षक वेडे असायचे. परंतू पुष्करने तर लहानपणीच ही हौस पुर्ण केली असुन तो स्वत:ला खरच नशीबवान समजत असेल यात शंका नाही.