झी मराठीची संस्कारी सून साकारणार खलनायिका, अभिनेत्रीची 'अबोली' मालिकेत एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 17:28 IST2025-04-11T17:28:05+5:302025-04-11T17:28:40+5:30

छोट्या पडद्यावर संस्कारी सूनेच्या रुपात दिसलेली अक्षया आता पहिल्यांदाच खलनायिका साकारताना दिसणार आहे. अक्षयाची स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत एन्ट्री होणार आहे.

punha kartavya aahe fame akshaya hindalkar to play villain in aboli serial | झी मराठीची संस्कारी सून साकारणार खलनायिका, अभिनेत्रीची 'अबोली' मालिकेत एन्ट्री

झी मराठीची संस्कारी सून साकारणार खलनायिका, अभिनेत्रीची 'अबोली' मालिकेत एन्ट्री

झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. याच मालिकेतून अभिनेत्री अक्षया हिंदळकरने वसुंधरा ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. छोट्या पडद्यावर संस्कारी सूनेच्या रुपात दिसलेली अक्षया आता पहिल्यांदाच खलनायिका साकारताना दिसणार आहे. अक्षयाची स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत एन्ट्री होणार आहे. 

याआधी अक्षयाने स्टार प्रवाहच्या 'साता जल्माच्या गाठी' आणि 'तुझ्या इश्काचा नादखुळा' या मालिकांमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. जवळपास ४ वर्षांनंतर 'अबोली' मालिकेतून ती स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे. सुप्रिया नागरगोजे असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून ती पहिल्यांदा खलनायिका साकारणार आहे. सुप्रिया नागरगोजे ही आपल्या जुळ्या बहिणीच्या म्हणजेच पौर्णिमाच्या खुनाचा प्रतिशोध घेण्यासाठी प्रयत्न करते आहे. तिला पूर्ण खात्री आहे की, पौर्णिमाचा घरगुती गॅस सिलिंडर स्फोटात झालेला मृत्यू हा अपघात नव्हे तर घातपात होता आणि हा सुनियोजित खून पोर्णिमाच्या सासू-सासऱ्यांनी केला आहे. 

परंतु हे सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे कोणताही पुरावा नाहीत. अशावेळी अबोली आपल्याला आणि आपल्या बहिणीला न्याय मिळवून देईल ह्या अपेक्षेने सुप्रिया अबोलीकडे येते. परंतु फटकळ आणि वाचाळ स्वभाव असलेल्या सुप्रियाच्या बोलण्यावर अबोलीचा विश्वासच बसत नाही. सुप्रिया आपल्या बहिणीला कसा न्याय मिळवून देणार? अबोली सुप्रियाला साथ देणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. 

Web Title: punha kartavya aahe fame akshaya hindalkar to play villain in aboli serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.