​अजय देवगण या मालिकेद्वारे करणार छोट्या पडद्यावर पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 16:56 IST2017-12-27T11:26:28+5:302017-12-27T16:56:28+5:30

मोठ्या पडद्यावरचे अनेक कलाकार छोट्या पडद्यावर सध्या काम करताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती, सलमान खानचा ...

Produced by Ajay Devgn, on this small screen | ​अजय देवगण या मालिकेद्वारे करणार छोट्या पडद्यावर पदार्पण

​अजय देवगण या मालिकेद्वारे करणार छोट्या पडद्यावर पदार्पण

ठ्या पडद्यावरचे अनेक कलाकार छोट्या पडद्यावर सध्या काम करताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती, सलमान खानचा बिग बॉस यांसारखे मोठ्या पडद्यावरील स्टारचे छोट्या पडद्यावरील कार्यक्रम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. आता मोठ्या पडद्यावरचा आणखी एक सुपरस्टार छोट्या पडद्यावर आपले भाग्य आजमवणार आहे. अजय देवगणसाठी यंदाचे वर्षं खूपच चांगले गेले. त्याच्या गोलमाल रिटर्न्स या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला गल्ला जमवला होता आणि आता अजय छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. पण अजय अभिनेता म्हणून नव्हे तर एक निर्माता म्हणून छोट्या पडद्यावर आपले भाग्य आजमावणार आहे.
डिस्कव्हरी जीतवर लवकरच बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित एक मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत बाबा रामदेव यांच्या बालपणापासून ते आजपर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवला जाणार आहे. या मालिकेची निर्मिती बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण करणार आहे. स्वामी रामदेवः एक संघर्ष असे या मालिकेचे नाव असून बाबा रामदेव यांनी आयुष्यात केलेला संघर्ष छोट्या पडद्यावर मालिकेच्या रूपाने मांडण्यात येणार आहे. या मालिकेत रामदेव बाबांचा सर्वसामान्य मुलगा ते जागतिक आयकॉन असा दीर्घ प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच बाबांचे सहकारी बाळकृष्ण यांच्याही आयुष्याशी निगडीत अनेक घटनाही दाखवण्यात येणार आहेत. 
स्वामी रामदेवः एक संघर्ष या मालिकेत नमन जैन हा बालकलाकार बाबा रामदेव यांच्या बालपणाची भूमिका साकारणार आहे. नमनने याआधी चिल्लर पार्टी या मालिकेत काम केले आहे. अजयने ट्वीट करत रामदेवः एक संघर्ष या मालिकेविषयी आणि नमन जैनच्या भूमिकेविषयी सांगितले आहे. त्याने नमनचा फोटो ट्वीट करून त्या सोबत लिहिले आहे की, डिस्कव्हरी जीत वरील रामदेवः एक संघर्ष या मालिकेत नमन स्वामी रामदेव यांच्या बालपणीची भूमिका साकारणार आहे. नमन हा खूपच चांगला कलाकार आहे. 
स्वामी रामदेवः एक संघर्ष या मालिकेत नमन जैन बाबा रामदेव यांच्या लहानपणाची भूमिका साकारणार आहे. पण या मालिकेत त्यांच्या तरुणपणाच्या भूमिकेत कोणता कलाकार असणार याबाबत मालिकेच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. 

Also Read : बॉलिवूडमधला सुपरस्टार हिरो करतोय मराठीत डेब्यू

Web Title: Produced by Ajay Devgn, on this small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.