माझ्या वैवाहिक जीवनात समस्या- अविनाश सचदेव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 18:49 IST2017-10-03T13:19:59+5:302017-10-03T18:49:59+5:30
बॉलिवूडमध्ये तर प्रेम, लग्न आणि घटस्फोट याचीही खुमासदार चर्चा रंगते. हिंदी चित्रपटसृष्टीतील एखाद्या कलाकाराचं लग्न मोडलं तर त्याची सर्वाधिक ...

माझ्या वैवाहिक जीवनात समस्या- अविनाश सचदेव
ब लिवूडमध्ये तर प्रेम, लग्न आणि घटस्फोट याचीही खुमासदार चर्चा रंगते. हिंदी चित्रपटसृष्टीतील एखाद्या कलाकाराचं लग्न मोडलं तर त्याची सर्वाधिक चर्चा रंगते.तो कलाकार जर रसिकांच्या गळ्यातला ताईत असेल तर या चर्चा आणखीच रंगतात. आता बॉलिवूडप्रमाणे टीव्ही कलाकारांच्याही लग्न मोडल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. यांत टीव्ही अभिनेता अविनाश सचदेवचं नाव जास्त चर्चेत आहे.‘आयुष्यमान भव’ या सूडकथेत अविनाश दुबेची व्यक्तिरेरखा साकारणारा अभिनेता अविनाश सचदेव याने आपले देखणे रूप आणि सहजसुंदर अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. या गुणवान अभिनेत्याची अभिनय कारकीर्द सुरळीत सुरू असली, तरी त्याच्या वैवाहिक जीवनात काही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शाल्मली देसाई या अभिनेत्री बरोबर 2015 तो लग्नबंधनात अडकला होता. मात्र दोघांचे चांगले जमत नसून सतत काही ना काही कारणामुळे खटके उडत असतात. त्यामुळे अविनाशने पत्नी शाल्मली घटस्पोट देण्याचा निर्णय घेतला आहे. “हो, माझ्या वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण झाल्या आहेत. मी असं काही घडेल, अशी अपेक्षाही केलेली नव्हती,पण ही गोष्ट खरी आहे. आम्ही दोघेही ती सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत. ही समस्या आम्हा दोघांची आणि आमच्या कुटुंबियांची आहे. मला माझी पत्नी सुखी व्हावी असं वाटतं. पण ही माझी वैयक्तिक बाब असल्याने मी त्याबद्दल उघडपणे काही बोलू इच्छित नाही. माझ्या अगदी जवळच्या मित्रांनाही यातील सत्य काय आहे, ते माहित नाही. यातून काही सोल्युशन नघाले तरे चांगल आहे.पण आम्हाला वेगळं व्हावं लागलं, तर तेही नाइलाजाने करावं लागेल,” असे अविनाशने सांगितले.सध्या मात्र तो अन्य कोणत्याही मालिकेपेक्षा अगदीच भिन्न कथा-संकल्पना असलेल्या ‘आयुष्यमान भव’ या मालिकेत भूमिका साकारण्यास उत्सुक झाला आहे.अविनाशने यापूर्वी बात हमारी पक्की है,प्रित से बंधी ये दोरी राम मिलाये जोडी,इस प्यार को क्या नाम दुँ,कबूल है या सारख्या मालिकेत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.