'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर श्रीदेवीची मराठमोळ्या अंदाजात हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 18:02 IST2017-06-28T12:16:09+5:302017-06-28T18:02:42+5:30

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात अनेक बॅालिवूड कलाकारांनी हजेरी लावत, मराठी भाषा बोलून रसिकांचे तुफान मनोरंजन केले. आता ...

The presence of Sridevi on the stage of 'Let It Come!' | 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर श्रीदेवीची मराठमोळ्या अंदाजात हजेरी

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर श्रीदेवीची मराठमोळ्या अंदाजात हजेरी

'
;चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात अनेक बॅालिवूड कलाकारांनी हजेरी लावत, मराठी भाषा बोलून रसिकांचे तुफान मनोरंजन केले. आता पुन्हा एकदा बॅालिवूडची एक गोड अभिनेत्री कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी सज्ज झालीय.आता बॉलिवूड हवा हवाई गर्ल श्रीदेवी देखील या शोमध्ये हजेरी लावणार आहे. विशेष म्हणजे यावेळी श्रीदेवी मराठमोळ्या लूकमध्ये या कार्यक्रमात झळकणार आहे. खास मराठी रसिकांसाठी श्रीदेवी मराठीत संवादही साधणार असल्याचे कळतंय.श्रीदेवी आगामी 'मॉम' सिनेमाच्या निमित्ताने थुकरटवाडीत येणार आहे.येत्या ७ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून मराठी कलाकरांप्रमाणेच बॉलिवुडच्या दिग्गज कलाकारांनी आपापल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये हजेरी लावून मराठी रसिकांचं फुल ऑन मनोरंजन केले आहे.याआधी या मंचावर सलमान खान,शाहरूख खान, सोनम कपूर,कंगणा राणौत यासारख्या अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावत त्यांचा मराठमोळा अंदाजही रसिकांना पाहायला मिळाला. बॉलिवूड सेलिब्रेटींना मराठी भाषाही बोलता येत नसली तरीही या भाषेतला गोडवा समजून स्वत:ही खूप मजा मस्ती करताना दिसले.त्यामुळे बी-टाऊनची मंडळी या मराठमोळ्या अंदाजाच्या प्रेमात पडतायत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पहिल्यांदाच श्रीदवीने एखाद्या मराठी कार्यक्रमात हजेरी लावत थुकरटवाडीत फुल ऑन धमाल केली. विशेष म्हणजे श्रेया बुगडेने 'हवा हवाई' बनत धमाकेदार नृत्य सादर केले. 


एक काळ आपल्या अभिनयानं गाजवणा-या श्रीदेवीनं इंग्लिश विंग्लिश सिनेमात एक आव्हानात्मक भूमिका साकारली.सिनेमाचं कथानक आणि श्रीदेवीच्या अभिनयानं थेट रसिकांच्या काळजाला हात घातला आणि श्रीदेवीचं कमबॅक यशस्वी ठरलं...आता पुन्हा एकदा संवेदनशील विषयासह मॉम बनत श्रीदेवी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'मॉम' या सिनेमानंतर श्रीदेवी 'मिस्टर इंडिया 2' सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात करणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. 1980 च्या दशकात रुपेरी पडद्यावर हिट ठरलेल्या या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये श्रीदेवी यांच्यासह अनिल कपूरही असणार आहेत.'मिस्टर इंडिया' सिनेमाचे दिग्दर्शक शेखर कपूर सिक्वेलचं दिग्दर्शन करणार नाहीत.त्यामुळे राकेश ओमप्रकाश मेहरा किंवा मॉमचे दिग्दर्शक रमेश उदयवार हे सिक्वेलचं दिग्दर्शन करणार असल्याचं बोललं जातंय.त्यामुळे आता सिक्वेलमध्ये मोगॅम्बोनंतर कोण असणार याकडेही रसिकांच्या नजरा लागल्यात.

Web Title: The presence of Sridevi on the stage of 'Let It Come!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.