चक्क उंची वाढवण्यासाठी प्रथमेश परबला उभे राहावे लागले दगडावर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 16:32 IST2017-03-08T10:45:54+5:302017-03-08T16:32:04+5:30
उंचीला कमी, रंग सावळा, सडपातळ बांधा असला तरी प्रथमेशने हम भी किसीसे कम नही म्हणत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांची ...
चक्क उंची वाढवण्यासाठी प्रथमेश परबला उभे राहावे लागले दगडावर!
उ चीला कमी, रंग सावळा, सडपातळ बांधा असला तरी प्रथमेशने हम भी किसीसे कम नही म्हणत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांची मनं जिंकली आहेत.बारिक शरिररचना असलेला सगळ्यांचा दगडू अर्थात प्रथमेश परबला ब-याचदा वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करत शूटिंग करावे लागत असावे,आता नुकताच त्याचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत प्रथमेश त्याची कोस्टार कृतिका देवसह त्याने प्रेम हे या मालिकेसाठी एक फोटोशूट केले होते. हे दोघेही उंचीला सारखेच असले तरीही एका फोटोत प्रथमेश कृतिकापेक्षा थोडा जास्त उंचीचा दिसावा म्हणून चक्क त्याला दगडावरच उभे राहत फोटोशूट करावे लागले.सध्या प्रथमेशचा हाच फोटो सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरतोय. काही दिवसांपूर्वीच त्याच्या या बारिक शरिरयष्टीमुळेच 'कॉमेडी नाईटस बचाव' या कार्यक्रमातही त्याची खिल्ली उडवण्यात आली होती. तेव्हाही प्रथमेशने बहुधा तो किस्सा जास्त मनावर घेतला नव्हता.त्यामुळे 'प्रेम हे' या मालिकेसाठी करण्यात आलेले प्रथमेशचे हे फोटोशूटही भन्नाटच म्हणावे लागेल.'प्रेम हे' मालिकेतील 'डांब-या' ही तिसरी कथा असून प्रथमेश परब साकारत असलेला डांब-याला खरंतर प्रेम म्हणजे नक्की काय हेही माहित नसते. अतिशय गरीब,झोपड्पट्टीत राहणारा हा मुलगा,पण स्वतःवर आणि त्याहून जास्त स्वतःच्या बोलबच्चनवर पूर्णपणे विश्वास ठेवणारा असा हा डाबंऱ्या प्रथमेशने साकारला आहे.डांब-या आणि कृतिका देव साकारत असलेली मोनिका हि दोन वेगळ्या मताची,भिन्न सामाजिक स्तरातील तरुण तरुणी,कशा प्रकारे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि पुढे या प्रेमाचं नक्की काय होत हे 'प्रेम हे' या मालिकेतील "डाबंऱ्या "ही गोष्ट पाहणे रंजक ठरणार आहे.यापूर्वीही 'टाईमपास' सिनेमात दगडू आणि प्राजुची लव्हस्टोरी रसिकांनी डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले होते.आता 'दगडु' नंतर 'डांब-या' बनत कृतिका देवसह प्रथमेशची केमिस्ट्री कशी रंगते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.