"यावर आता कमेंटमध्ये चर्चा नको...", अस चाहत्यांना का म्हणाली प्राजक्ता माळी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 02:00 PM2023-08-31T14:00:19+5:302023-08-31T14:04:34+5:30

मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते.

Prajakta Mali share her latest photoshoot on social media | "यावर आता कमेंटमध्ये चर्चा नको...", अस चाहत्यांना का म्हणाली प्राजक्ता माळी?

"यावर आता कमेंटमध्ये चर्चा नको...", अस चाहत्यांना का म्हणाली प्राजक्ता माळी?

googlenewsNext

अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali)ने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच प्राजक्ताने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आली आहे. 

प्राजक्ताने सोशल मीडियावर फोटोशूटमधले काही निवडक फोटो शेअर केलेत. हे फोटो शेअर करताना प्राजक्ताने जे काही लिहिले आहे त्याची जास्त चर्चा होतेय. प्राजक्ताने लिहिले, ''स्वतःला म्हणत नाहीये; ही माझी ringtone आहे.. काही caption सुचलं नाही की गाण्याचे lyrics टाकते.. - तुम्हाला तर माहितीच आहे. आत्ताही काही सूचत नव्हतं. विनंती विशेष- आता मराठी गाणं ringtone का नाही? ह्यावर comments मध्ये चर्चा नको.. माझ्या ringtones mood नुसार सतत बदलत असतात..आत्ता ही आहे, इतकच.'' यावर प्राजूच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

एका यूजरने लिहिले, ''माझं काळीज प्राजक्ता माळीच.'' दुसऱ्या यूजर्सने लिहिले, भारी आहे रिंगटोन.'' आणखी एकाने लिहिले, ''आळी मिळी गुप चिळी,आली आपली प्राजक्ता माळी.''

वर्कफ्रंटबद्दल...
मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात काही मालिकेत काम करून प्राजक्ता घराघरात पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचेही स्वप्न तिने पाहिले आणि ते स्वप्न सत्यात उतरवले. मालिका, चित्रपट, वेबसिरीज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ताने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या शोमधील तिच्या लूकची बऱ्याचदा चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाबद्दल सांगायचं तर प्राजक्ता शेवटची लकडाउन चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अकुंश चौधरी मुख्य भूमिकेत झळकली आहे. 

Web Title: Prajakta Mali share her latest photoshoot on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.