प्राजक्ता माळीनं दिली खुशखबर...!, म्हणाली - 'फक्त दोन दिवस वाट पाहा...'; व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 16:49 IST2023-01-04T16:49:12+5:302023-01-04T16:49:56+5:30

Prajakta Mali : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सातत्याने चर्चेत येत असते.

Prajakta Mali gave good news...!, said - 'Just wait for two days...'; Video discussion | प्राजक्ता माळीनं दिली खुशखबर...!, म्हणाली - 'फक्त दोन दिवस वाट पाहा...'; व्हिडीओ चर्चेत

प्राजक्ता माळीनं दिली खुशखबर...!, म्हणाली - 'फक्त दोन दिवस वाट पाहा...'; व्हिडीओ चर्चेत

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सातत्याने चर्चेत येत असते. कधी ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते तर कधी पोस्टमुळे. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे तेही सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे. या व्हिडीओतून तिने चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे.

प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती सुरुवातीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसते आहे आणि म्हणतेय...''फक्त काही दिवस वाट पाहा...मी या नवीन वर्षात तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येतेय. आशा आहे तुम्ही माझ्या या नवीन प्रोजेक्टचं देखील कौतूक कराल''. प्राजक्ता माळीने हा व्हिडीओ शेअर केला अन् चाहत्यांना आता उत्सुकता लागलीय ती ६ जानेवारीची. प्राजक्ता नेमकी काय घोषणा करते याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ता लवकरच नवीन इनिंगला सुरूवात करणार आहे. ती अभिनयाशिवाय नवीन बिझनेस सुरू करणार आहे. आता ती नेमकं काय करणार आहे, हे जाणून घ्यायला चाहते उत्सुक आहेत. ती पारंपरिक दागिन्यांचा बिझनेस करणार आहे. ज्याचं नाव आहे 'प्राजक्तराज'...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्राजक्ताच्या या नवीन ब्रॅन्डचं उद्धाटन होणार आहे.

Web Title: Prajakta Mali gave good news...!, said - 'Just wait for two days...'; Video discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.