"माझी लाडकी प्राजक्ता...", 'राणी' म्हणत अमृता खानविलकरने प्राजक्ता माळीला दिल्या हटके शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 11:10 AM2023-08-08T11:10:43+5:302023-08-08T11:11:04+5:30

Prajakta Mali Birthday : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस आहे. अमृता खानविलकरने प्राजक्ताला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

prajakta mali birthday amruta khanvilkar wish actress shared special post on instagram | "माझी लाडकी प्राजक्ता...", 'राणी' म्हणत अमृता खानविलकरने प्राजक्ता माळीला दिल्या हटके शुभेच्छा

"माझी लाडकी प्राजक्ता...", 'राणी' म्हणत अमृता खानविलकरने प्राजक्ता माळीला दिल्या हटके शुभेच्छा

googlenewsNext

अभिनयाप्रमाणेच सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या प्राजक्ताचा आज वाढदिवस आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. छोट्या पडद्यावर काम करुन लोकप्रियता मिळवलेल्या प्राजक्ताने मोठ्या पडद्यावरही अभिनयाची जादू दाखविली. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'चंद्रमुखी' चित्रपटात प्राजक्ता अमृता खानविलकरबरोबर झळकली होती. आज प्राजक्ताच्या वाढदिवशी अमृताने तिच्याबरोरचा खास फोटो शेअर तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

अमृताने 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा महाराष्ट्राची हास्यजत्रा सेटवरचा प्राजक्ताबरोबरचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. या फोटोला अमृताने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "माझी लाडकी लाडकी प्राजक्ता...हॅपी बर्थडे रानी...खूप खूप प्रेम आणि आम्हाला प्रेरित करत राहा...लव्ह यू," असं म्हणत अमृताने प्राजक्ताला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. 

'चंद्रमुखी' चित्रपटातील प्राजक्ता आणि अमृताचं लावणी गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. त्यांची सवाल जवाब गाण्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्राजक्ता आणि अमृताने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटवरही ठुमके लावले होते. 

सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. प्राजक्ताने 'लकडाऊन', 'चंद्रमुखी', 'हंपी', 'व्हाय', 'डोक्याला शॉट' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'रानबाजार' या वेब सीरिजमध्येही प्राजक्ता महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती. 

Web Title: prajakta mali birthday amruta khanvilkar wish actress shared special post on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.