शक्ती गेली भारावून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 15:48 IST2016-06-22T10:18:38+5:302016-06-22T15:48:38+5:30
डान्स प्लस या कार्यक्रमात शक्ती मोहन मेन्टरची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमाच्या ऑडिशनला आलेल्या लोकांचे नृत्य पाहून ती अक्षरशः भारावून ...

शक्ती गेली भारावून
ड न्स प्लस या कार्यक्रमात शक्ती मोहन मेन्टरची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमाच्या ऑडिशनला आलेल्या लोकांचे नृत्य पाहून ती अक्षरशः भारावून गेली होती असे ती सांगते. या ऑडिशनमधून तिने सात-आठ जणांची निवड केली असून यांचे नृत्य आता रेमो डिसोझा पाहणार आहे. रेमो यातून काही जणांची पुढील फेरीसाठी निवड करणार आहे. शक्तीच्या टीममध्ये असणाऱ्या मंडळींपैकी दोन मुले ही कचरा गोळा करून आपले पोट भागवणारी आहेत. इतक्या बिकट परिस्थितीतही त्यांनी त्यांचे नृत्याची आवड आजही जोपासली आहे याचा तिला आनंद असल्याचे ती सांगते.