n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील पोपटलालचे लग्न कधी होणार याची उत्सुकता आपल्याला सर्वांनाच लागलेली आहे. अनेकवेळा तर पोपटलाल लग्नाच्या मंडपापर्यंतही पोहोचलेला आहे. पण काही कारणास्तव त्याच्या लग्नात विघ्नं आली आणि पोपटलाल एकटाच राहिला. पण पोपटलालसाठी आता एक स्थळ आले आहे. पण त्या मुलीची एकच अट आहे की, तिच्या नवऱयाने वरातीत घोड्यावरून न येता सायकलवरून यावे. पोपटलालला पाहायला येणाऱया मुलीला लहानपणापासूनच सायकलीचे खूप वेड आहे. त्यामुळे तिचा नवरा लग्नात हा सायकलीवरून यावा अशी तिची इच्छा आहे. त्यामुळे पोपटलाल लग्नात सायकलवरून जाणार आहे. एवढेच नव्हे तर इतर गोकुळधामवासीयही त्याच्या लग्नाला सायकलवरून जाणार आहेत. पण एवढे करूनही पोपटलालचे लग्न होणार का हा प्रश्नच आहे.