pool romance: गौरव आणि त्याच्या पत्नीचा रोमँटिक हॉलीडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 11:17 IST2017-05-25T05:47:11+5:302017-05-25T11:17:11+5:30
सोशल मीडियावर दोघांनी आपल्या हॉलीडेचे फोटो शेअर केले आहेत. गौरव आणि आकांक्षा स्विमिंग पूलमध्ये रोमँटिक पोज देत असल्याचा फोटो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतोय.

pool romance: गौरव आणि त्याच्या पत्नीचा रोमँटिक हॉलीडे
गौरवचे हे रिअल लाईफ फोटो जितके त्याच्या चाहत्याच्या पसंती उतरत आहेत. तितकेच त्याचे ऑनस्क्रीन कामही रसिकांना भावतंय. गौरव खन्ना राजपुत्र विरेंद्र सिंग तर क्रितिका कामरा 'चंद्रकांता' ही भूमिका साकारत आहे. मालिकेतील क्रितिका आणि गौरवची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीबद्दल गौरव सांगतो, "क्रितिका ही खूप चांगली अभिनेत्री असल्यामुळेच आमच्या दोघांची केमिस्ट्री खूप चांगली जुळून आली आहे. सहकलाकार म्हणून तुम्ही एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेतले तर तुमचे परफॉर्मन्स अधिक चांगले होतात असे मला वाटते. क्रितिकामुळे माझी भूमिका अधिक खुलून येत आहे असे मला वाटते.तिच्यामुळेच मला काम करणे अधिक सोपे जात आहे. खऱ्या आयुष्यातही आम्ही दोघांची खूप चांगली मैत्री आहे आणि त्यामुळे हीच केमिस्ट्री प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळत आहे.