​या कारणामुळे पूजा शर्माने सोडले मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2017 12:44 IST2017-06-19T07:14:13+5:302017-06-19T12:44:13+5:30

पूजा शर्माने तेरी मेरी लव्ह स्टोरी या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती पवित्र रिश्ता या मालिकेत झळकली. ...

Pooja Sharma has left Mumbai due to this reason | ​या कारणामुळे पूजा शर्माने सोडले मुंबई

​या कारणामुळे पूजा शर्माने सोडले मुंबई

जा शर्माने तेरी मेरी लव्ह स्टोरी या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती पवित्र रिश्ता या मालिकेत झळकली. पण तिला खऱ्या अर्थाने तिला महाभारत या मालिकेने प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेत तिने साकारलेली द्रौपतीची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. आता ती एका पौराणिक मालिकेत झळकणार आहे.
महाकाली महाकाली... अंत ही आरंभ है ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत पूजा महाकालीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी तिने सध्या काही दिवसांसाठी मुंबई सोडले आहे.
महाकाली... अंत ही आरंभ है या मालिकेत प्रेक्षकांना पार्वती देवीचा महाकाली बनण्याचा प्रवास पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा भव्य सेट उमरगाव येथे बांधण्यात आला आहे. त्यामुळे  या मालिकेची टीम सध्या मुंबई सोडून तिथेच सेटल झाली आहे. या मालिकेसाठी मालिकेची संपूर्ण टीम खूपच मेहनत घेत आहे. मालिकेच्या सेटच्या जवळच सर्व कलाकारांची राहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याविषयी पूजा सांगते, आमच्या मालिकेचा सेट हा उमरगाव येथे आहे. उमरगाव ते मुंबई हे अंतर कापण्यासाठी जवळजवळ चार तास लागतात. त्यामुळे आमच्यासाठी दररोज प्रवास करणे शक्य नव्हते. दररोज इतका मोठा प्रवास करण्यापेक्षा आम्ही सगळ्यांनीच मालिकेच्या सेटच्या जवळपासच राहायचे ठरवले.यामुळे आमचा वेळ वाचत आहे आणि यामुळे आम्हाला चित्रीकरणालादेखील जास्त वेळ देता येत आहे. आम्ही घरीच राहात आहोत असे आम्हाला वाटावे यासाठी आम्हाला सगळ्यांना तिथे जवळपास घरे देण्यात आलेली आहेत. पण तरीही मी माझे कुटुंब, मित्रमैत्रिणी यांना मिस करत आहे. मी मुंबईत परत जाऊन त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची वाट पाहात आहे. 

Web Title: Pooja Sharma has left Mumbai due to this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.