​पूजा जोशी बनणार आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 17:09 IST2017-02-27T11:39:24+5:302017-02-27T17:09:24+5:30

पूजा जोशीने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने ओळख ...

Pooja Joshi is going to be | ​पूजा जोशी बनणार आई

​पूजा जोशी बनणार आई

जा जोशीने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या मालिकेत ती वर्षा ही भूमिका साकारत आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते. या भूमिकेसाठी वर्षाचे सगळेच कौतुक करतात. तसेच या भूमिकेसाठी तिला आतापर्यंत अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. या मालिकेद्वारे ती नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.
पूजाच्या फॅन्ससाठी आता एक गोड बातमी आहे. पूजा लवकरच आई होणार आहे. पूजाने ही बातमी मीडियासोबत शेअर केली नसली तरी ती आई होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 
पूजाने 2015च्या नोव्हेंबर महिन्यात मनिष अरोरा या तिच्या प्रियकरासोबत लग्न केले होते. मनिष हा अकोल्यातील एक प्रसिद्ध व्यवसायिक असून एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्या दोघांची ओळख झाली होती. तिच्या लग्नाला ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील सगळ्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. पूजा अजूनही ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचे चित्रीकरण करत आहे. पूजा आई होणार असल्याच्या बातमीला तिने दुजोरा दिला नसला तरी ती आई होणार याबाबत इंडस्ट्रीत जोरदार चर्चा आहे. 
नुकत्याच छोट्या पडद्यावरच्या अनेक अभिनेत्री आई बनल्या आहेत. श्वेता तिवारीने एका गोंडस मुलाला नुकताच जन्म दिला आहे तर कसम से या मालिकेत झळकलेल्या रोशनी चोप्राने तिच्या दुसऱ्या मुलाला गेल्या महिन्यात जन्म दिला. श्वेता साळवेला नुकतीच मुलगी झाली तर मानसी पारेखने एका गोंडस मुलीला नुकताच जन्म दिला. तसेच बडे अच्छे लगते है या मालिकेतील चाहत खन्नानेदेखील मुलीला जन्म दिला. 




Web Title: Pooja Joshi is going to be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.