Pics:प्राजक्ता माळीने पुन्हा केले ग्लॅमरस Photo shoot
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 13:13 IST2017-09-15T05:28:07+5:302017-09-15T13:13:49+5:30
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा बोल्ड आणि हॉट अंदाज समोर आला आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. 'ती पाहता ...

Pics:प्राजक्ता माळीने पुन्हा केले ग्लॅमरस Photo shoot
अ िनेत्री प्राजक्ता माळी हिचा बोल्ड आणि हॉट अंदाज समोर आला आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. 'ती पाहता हसीन बाला, कलेजा खलास झाला या ओळी ही आपुसकच तोंडावर येतील असा हा प्राजक्ताचा सेक्सी आणि बोल्ड लूक सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.याआधीही प्राजक्ता माळीचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. रसिकांकडून प्राजक्ताच्या या फोटोंना बरेच लाइक्सही मिळाले होते. आता पुन्हा एकदा प्राजक्ताचा सेन्सेशन्ल बोल्ड अंदाज रसिकांसमोर आला आहे. प्राजक्ता माळीचे आणखी एक बोल्ड फोटोशूट निमित्त ठरले आहे. सोशल मीडियावर सध्या प्राजक्ताच्या या फोटोची चर्चा रंगली आहे.यातील एका फोटोत प्राजक्ताचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात प्राजक्ताचा हा फोटो आहे.प्राजक्ताच्या या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.
Also Read:प्राजक्ता माळीचा कोणता अंदाज तुम्हाला भावतो पारंपरिक की वेस्टर्न?
![]()
या फोटोशिवाय बबली आणि शॉपिंग तसंच फन मूडमध्ये असलेले फोटोही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. यांत प्राजक्ताने शॉर्ट, शर्ट आणि आकर्षक असे शूज परिधान केलेत. रॉकिंग आणि स्टनिंग स्टाईलसह चेह-यावरील घायाळ करणारे स्माईल यामुळे प्राजक्ताच्या या फोटोंचीही सोशल मीडियावर खुमासदार चर्चा रंगली आहे. प्राजक्ता माळी तिच्या अभिनयामुळे अल्पावधीत रसिकांची लाडकी बनली आहे. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहचली. याआधीही तिने सुवासिनी, बंध रेशमाचे, गाणे तुमचे आमचे, सुगरण अशा मालिकांमध्ये काम केलं होतं. खो-खो, संघर्ष, गोळाबेरीज अशा मराठी सिनेमांमध्येही प्राजक्ताने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या प्राजक्ताची नकटीच्या लग्नाला यायचं हं, ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या मालिकेतील प्राजक्ताचा खट्याळ अंदाज आणि पारंपरिक लूक रसिकांना चांगलाच भावतो आहे. अभिनयासह तिचा लूक चर्चेचा विषय ठरतो आहे. मराठमोळ्या घरातील मराठमोळी मुलगी साकारणारी प्राजक्ता रसिकांची फेव्हरेट ठरत आहे. मराठमोळ्या घरातील मराठमोळी मुलगी साकारणारी प्राजक्ता रसिकांची फेव्हरेट ठरत आहे. याआधी विविध मालिकांमध्येही प्राजक्ता माळीचा मराठमोळा लूक रसिकांना भावला होता. पारंपरिक साडीतील तिचा मराठमोळा लूक रसिकांवर जादू करुन गेला. कधी ड्रेस घालून फेटा परिधान करुन तिने रसिकांची मनं जिंकली. तिचा पारंपरिक अंदाज तिच्या फॅन्सना आवडला. तिच्या पारंपरिक लूकची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा तिच्या बोल्ड, हॉट आणि सेक्सी अंदाजाचीही झाली. आकर्षक स्लीवलेस काळ्या रंगाचा टॉप, तितक्याच घायाळ करणा-या अदा, मोकळे सोडलेले केस असा प्राजक्ताचा सेक्सी अंदाजही रसिकांनी पाहिला आहे. आता पुन्हा एकदा प्राजक्ताचे हॉट आणि बोल्ड फोटो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्याचे पाहायला मिळत आहे.