सुजलेला चेहरा तरी कॅमेऱ्यासमोर हसताना दिसला पवनदीप, शुद्धीत आल्यानंतरचा पहिला Photo व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:28 IST2025-05-08T12:26:06+5:302025-05-08T12:28:37+5:30

पवनदीपचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

pawandeep rajan woke up seen smiling for camera now out of danger after terrific accident | सुजलेला चेहरा तरी कॅमेऱ्यासमोर हसताना दिसला पवनदीप, शुद्धीत आल्यानंतरचा पहिला Photo व्हायरल

सुजलेला चेहरा तरी कॅमेऱ्यासमोर हसताना दिसला पवनदीप, शुद्धीत आल्यानंतरचा पहिला Photo व्हायरल

इंडियन आयडॉल फेम गायक पवनदीप राजनचा (Pawandeep Rajan) दोन दिवसांपूर्वी भयानक अपघात झाला होता. उत्तराखंडहून तो दिल्लीला येत होता. या प्रवासात अमरोहा जिल्ह्यातील गजरौला भागात त्याच्या कारचा अपघात झाला. यामध्ये तो गंभीर झाला. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. आता पवनदीपच्या तब्येतीत सुधारणा असून हॉस्पिटलमधून त्याचा फोटोही समोर आला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, पवनदीपच्या गाडीचा अपघात अमरोहा जिल्ह्यातील गजरौला भागात झाला. गजरौला येथील नॅशनल हायवे ९ ला मध्यरात्री हा अपघात झाला. ड्रायव्हरचा डोळा लागल्याने त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं त्यामुळे कार कंटेनरला जाऊन धडकली.  यामध्ये पवनदीपच्या गाडीचं मोठं नुकसान झालं. सुदैवाने पवनदीप यातून बचावला. परंतु त्याच्या दोन्ही हाताला गंभीर जखम झाली आहे. या दुर्घटनेत पवनदीप आणि त्याचे २ मित्रही जखमी झाले. पवनदीपवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. कालच त्याला शुद्ध आली असून हॉस्पिटलमधून त्याचा फोटो आला आहे. यामध्ये तो बेडवरुन असून त्याला चेहरा खूप सूजलेला दिसतोय. मात्र तरी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. त्याला हसताना पाहून चाहत्यांच्याही जीवात जीव आला आहे.


पवनदीप मूळचा उत्तराखंडचा आहे. त्याच्या उत्कृष्ट गायकीमुळे त्याचे जगभरात चाहते आहेत. इंडियन आयडॉल १२ चा तो विजेता आहे. भारतात नव्हे तर परदेशातही पवनदीप राजनच्या म्यूझिक कॉन्सर्टला त्याचे चाहते हजेरी लावत असतात. सध्या तो मोठ्या अपघातातून सावरत आहे. यादरम्यान त्याचे आगामी कॉन्सर्ट्स रद्द झाले आहेत. 

Web Title: pawandeep rajan woke up seen smiling for camera now out of danger after terrific accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.