'पारु' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, पारु-अहिल्या येणार आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:51 IST2025-11-25T12:50:34+5:302025-11-25T12:51:03+5:30
Paru Serial : झी मराठी वाहिनीवरील 'पारु' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत किर्लोस्कर कुटुंबात मोठ्या भावनिक घडामोडी घडत आहे.

'पारु' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, पारु-अहिल्या येणार आमनेसामने
झी मराठी वाहिनीवरील 'पारु' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत किर्लोस्कर कुटुंबात मोठ्या भावनिक घडामोडी घडत आहे. अलीकडे संपूर्ण किर्लोस्कर कुटुंब आदित्यच्या कार्यक्रमाला वेषांतर करून, गर्दीत चेहरा लपवत पोहोचले आहे. आदित्यला पाहताना अहिल्याच्या डोळ्यांत अश्रू दाटतात आणि हा क्षण श्रीकांतच्या मनाला लागतो. या घटनेनंतर किर्लोस्कर घरात श्रीकांत आणि अहिल्या यांच्यात जोरदार वाद रंगतो आणि त्या तणावपूर्ण क्षणी श्रीकांतला हृदयविकाराचा झटका येतो. ही बातमी ऐकून आदित्य पारुच्या समोर डोंगर कोसळतो.
श्रीकांत अहिल्याला शेवटची विनंती करतो की, ''आपला मुलगा आणि सून दोघांनाही परत घरी आण.'' या विनंतीनंतर अहिल्या थेट पारुला भेटते. या प्रसंगातून घरातील अनेक दडलेली गुपितं उघड होऊ लागतात. पारू आता शिक्षण आणि जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी अधिक दृढनिश्चयाने उभी राहणार आहे. दुसरीकडे आदित्य आपलं ड्रीम स्कूल प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो. आता आदित्य आणि अहिल्या एकाच छताखाली आहेत, मात्र एकमेकांशी न बोलता भावनिक नातं जपतात.
दरम्यान, प्रिया आणि पारुचं नातं अधिक घट्ट होतं पण याच काळात दिशा, पारु आणि प्रिया यांच्यात थेट टक्कर सुरू होते आणि घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनतं. महिन्याच्या अखेरीस प्रिया आणि पारु एकत्र येऊन दिशा ला घराबाहेर काढण्याची योजना आखणार आहेत. या निर्णायक घडामोडींमुळे किर्लोस्कर कुटुंबातील पुढील अध्याय अधिकच रोमांचक होणार हे नक्की.