पारस गेला सुट्टीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:11 IST2016-10-10T10:41:05+5:302016-10-17T10:11:00+5:30
साथ निभाना साथिया या मालिकेत अहमची भूमिका साकारणारा पारस बब्बर गेले कित्येक दिवसांपासून तापाने त्रस्त आहे. या तापातही तोे ...
पारस गेला सुट्टीवर
स थ निभाना साथिया या मालिकेत अहमची भूमिका साकारणारा पारस बब्बर गेले कित्येक दिवसांपासून तापाने त्रस्त आहे. या तापातही तोे मालिकेचे चित्रीकरण करत होता. पण आता त्याची तब्येत अधिक खालावली असल्याने डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ताप उतरत नसल्याने त्याला डॉक्टरने काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या. या टेस्टमधून त्याला डेंग्यु झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. यामुळे तो आता काही दिवस तरी चित्रीकरण करणार नाही. याविषयी तो सांगतो, "मला 104 डिग्री ताप असतानाही मी चित्रीकरण करत होतो. मला व्हायरल फिव्हर असेल आणि तो एक-दोन दिवसांतच जाईल असे मला वाटत होते. पण आता मला काही दिवस तरी मला आराम करावा लागणार आहे."