पल्लवी प्रधानने तिच्या मित्राविषयी शेअर केल्या काही खास गोष्टी?का आहे दोघांमध्ये इतकी चांगली मैत्री जाणून घेण्यासाठी वाचा.
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 13:44 IST2016-12-07T13:42:09+5:302016-12-07T13:44:12+5:30
प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक चांगला मित्र असतो. प्रत्येक गोष्ट आपण त्याच्याशी शेअर करतो.कधी तो आपल्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशनही देतो अशा ...
पल्लवी प्रधानने तिच्या मित्राविषयी शेअर केल्या काही खास गोष्टी?का आहे दोघांमध्ये इतकी चांगली मैत्री जाणून घेण्यासाठी वाचा.
प रत्येकाला आपल्या आयुष्यात एक चांगला मित्र असतो. प्रत्येक गोष्ट आपण त्याच्याशी शेअर करतो.कधी तो आपल्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशनही देतो अशा या खास मित्रांची जागा आपल्या आयुष्यात नेहमी खास असते. त्यामुळे आपल्या मित्राविषयी प्रत्येकजण भरभरून बोलत असतो. असेच काहीसे खास किस्से पल्लवी प्रधाननेही तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. पल्लवी प्रधानचा हा खास मित्र कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असणारच तर हो तिचा खास मित्र दुसरी तिसरा कोणीही नसून तो आहे तिचा सह कलाकार राजेंद्र चावला.होय,‘बहू हमारी रजनी-कान्त’ मालिकेत सुरिली या सासूची भूमिका साकारणारी पल्लवी प्रधान आणि तिच्या पतीची भूमिका साकारणारा राजेंद्र चावला हे एकमेकांना फार पूर्वीपासून ओळखतात, ही गोष्ट फारशी कोणाला ठाऊक नाही. खूप वर्षांपूर्वी या दोघांनी एका मराठी मालिकेत एकत्र भूमिका रंगविल्या होत्या. ‘बहू हमारी…’ मालिकेत राजेंद्र एका पंजाबी सास-याची; तर पल्लवी प्रधान ही त्यांच्या बंगाली पत्नीची भूमिका साकारीत आहे. या दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री तर अप्रतिम आहेच; पण वास्तव जीवनातही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांची ही मैत्री 1994 पासून टिकून आहे.या जुन्या मैत्रीसंदर्भात विचारले असता, पल्लवी प्रधान म्हणाली, “आम्ही दोघांनी 1994 मध्ये 'दामिनी' नावाच्या मराठी मालिकेत एकत्र भूमिका साकारल्या होत्या आणि तेव्हापासून आमच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. त्यात आम्ही एकमेकांचे नायक-नायिका नसलो, तरी आम्ही एकाच मालिकेचा भाग होतो. त्यामुळे आम्ही एकमेकांचे मित्र बनलो. पुढे 2000 सालातही आम्ही एका मराठी मालिकेत काम केलं होतं. आता ‘बहू हमारी रजनी-कान्त’ मालिकेत आम्ही पती-पत्नीची भूमिका साकारीत आहोत. आम्ही या क्षेत्रात संघर्ष करीत असल्यापासून एकमेकांना ओळखत आहोत आणि आमचं नातं मैत्रीचं आहे. आम्ही आजही एकमेकांचे सल्ले मागतो. आमच्यात सकारात्मक भावना असल्याने तिचंच प्रतिबिंब मालिकेतील आमच्या भूमिकेत पडतं.” माझा मित्र मला चांगलं समजून घेतो त्यामुळे आम्ही दोघेही कोणतीही भूमिका असो ती भूमिका अगदी सहज करतो.माझ्या आयुष्यात माझ्या कुटूंबाइतकेच माझ्या मित्राचेही स्थान असल्याचेही पल्लवीने सांगितले.