पल्लवी पाटीलने पुन्हा एकदा शेअर केला बोल्ड फोटो, सगळीकडे रंगलीय याचीच चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 17:49 IST2021-03-26T17:43:17+5:302021-03-26T17:49:31+5:30

पल्लवीचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

pallavi patil shares bold picture on instagram | पल्लवी पाटीलने पुन्हा एकदा शेअर केला बोल्ड फोटो, सगळीकडे रंगलीय याचीच चर्चा

पल्लवी पाटीलने पुन्हा एकदा शेअर केला बोल्ड फोटो, सगळीकडे रंगलीय याचीच चर्चा

ठळक मुद्देपल्लवीने काही दिवसांपूर्वी तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि पुन्हा एकदा तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संग्राम समेळ नुकताच दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. संग्रामच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाले. इचलकरंजीला हा विवाह सोहळा पार पडला. संग्रामचे हे दुसरे लग्न आहे. २०१६ मध्ये संग्रामचे पल्लवी पाटीलसोबत लग्न झाले होते मात्र काही कारणामुळे दोघे वेगळे झाले. पल्लवीने काही दिवसांपूर्वी तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि पुन्हा एकदा तिचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

पल्लवीने शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला ती स्विमिंगपूलच्या कठड्यावर उभी दिसत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तू खूपच हॉट दिसत आहेस असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

'पार्टनर' या एकांकिकेतून पल्लवीला खूप लोकप्रियता मिळाली होती. तसेच रुंजी या मालिकेमुळे पल्लवी घराघरात पोहोचली. तिने बापमाणूस या मालिकेत साकारलेल्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. तसेच ती अग्निहोत्र 2 मध्ये दिसली होती.

संग्रामने काहीच दिवसांपूर्वी दुसरे लग्न केले असून त्याची पत्नी श्रद्धा फाटक डान्सर आहे. ती डान्सचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत श्रद्धा फाटक संग्रामबद्दल भरभरून बोलली होती. संग्राम खूप काळजी घेतो आणि प्रेमळ असल्याचे तिने सांगितले होते.

Web Title: pallavi patil shares bold picture on instagram