या अभिनेत्रीच्या बोल्ड अँड ब्युटीफूल फोटोची रंगलीय सगळीकडे चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 16:21 IST2021-05-26T16:19:20+5:302021-05-26T16:21:32+5:30

या फोटोत ती खूपच छान दिसत असल्याचे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

pallavi patil bold and beautiful picture | या अभिनेत्रीच्या बोल्ड अँड ब्युटीफूल फोटोची रंगलीय सगळीकडे चर्चा

या अभिनेत्रीच्या बोल्ड अँड ब्युटीफूल फोटोची रंगलीय सगळीकडे चर्चा

ठळक मुद्देपल्ल्वीचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

पल्लवी पाटील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

पल्लवीने शेअर केलेला तिचा हा फोटो जुना असला तरी या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या फोटोत ती खूपच छान दिसत असल्याचे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. पल्ल्वीचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तू खूपच हॉट दिसत आहेस असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

'पार्टनर' या एकांकिकेतून पल्लवीला खूप लोकप्रियता मिळाली होती. तसेच रुंजी या मालिकेमुळे पल्लवी घराघरात पोहोचली. तिने बापमाणूस या मालिकेत साकारलेल्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. तसेच ती अग्निहोत्र 2 मध्ये दिसली होती.

Web Title: pallavi patil bold and beautiful picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.