पहेन दी पूरा लंडन का ठुमका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 12:59 IST2016-04-12T21:39:17+5:302016-04-13T12:59:23+5:30
कोणते लग्न, सोहळे, कार्यक्रम असो नजर जाते ती प्रत्येकाच्या कपडयांवर. वा... वा अरे किती छान कपडे आहेत किवा कुठून ...
.jpg)
पहेन दी पूरा लंडन का ठुमका
क णते लग्न, सोहळे, कार्यक्रम असो नजर जाते ती प्रत्येकाच्या कपडयांवर. वा... वा अरे किती छान कपडे आहेत किवा कुठून घेतले, कितीला अशा अनेक प्रश्नांना यावेळी सामोरे जावे लागते. अभिनेत्री स्पृहा जोशीला देखील अशाच प्रश्नांना सामारे जावे लागले. पण त्यामुळे साहजिकच तिला या प्रश्नांनी आठवण करून दिली ती लंडनच्या शॉपिंगची. स्पृहाने मध्यंतरी सुंदर असा व्हाईट कलरचा वन पीस परिधान केला होता. त्यावर गोल्डन कलरचे आकर्षित असे वेस्टन पद्धतीची माळ गळयात घातली होती. यामध्ये तिचा हा अंदाज एकदम हटके दिसत होता.त्यामुळे तिच्या कॉश्चुमचे सर्वानी भरभरून कौतुक केले. या जबरदस्त काश्च्युमवर स्पृहाने मस्त फोटोसेशनदेखील केले आहे. तिचे हे रूप पाहता असेच म्हणावे लागले की, नचचे पहेन दी पूरा लंडन का ठुमका.
![]()