'...असे आहे आमचे नाते', रसिका सुनीलने बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत सांगितले त्यांच्या रिलेशनशीपबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 21:35 IST2021-07-19T21:34:55+5:302021-07-19T21:35:51+5:30
रसिका सुनील हिने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबतचा रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल लिहिले आहे.

'...असे आहे आमचे नाते', रसिका सुनीलने बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत सांगितले त्यांच्या रिलेशनशीपबद्दल
अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनायाच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. ही मालिका आता बंद झाली असली तरीदेखील आजही शनाया प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या मालिकेनंतर रसिका सुनील कोणत्या मालिकेत किंवा चित्रपटात झळकली नाही. मात्र ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे आणि बॉयफ्रेंडसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकताच तिने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
रसिका सुनील हिने बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आणि लिहिले की, मी या फोटोच्या प्रेमात पडले आहे. हा फोटो आमच्यातील नात्याबद्दल सांगतो. मी लहान मुलगी असून त्याचा हात नेहमी माझ्या डोक्यावर असतो म्हणजेच नेहमी तो माझ्या पाठिशी कुठेही खंबीरपणे उभा असतो. आदि सर्वोत्तम व्यक्ती आहे. लव यू बिन. आणखी फोटो लवकरच येणार.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत रसिका सुनीलने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे जगजाहीर केले होते. ती बऱ्याचदा आदित्यसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
आदित्य बिलागीच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टनुसार तो इंजिनिअर, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे आणि तो लॉस अँजेलिसमध्ये राहातो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर रसिकाचे अनेक फोटो पाहायला मिळतात. रसिका आणि आदित्यची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.
रसिका सुनीलने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेव्यतिरिक्त गर्लफ्रेंड, बसस्टॉप आणि बघतोस काय मुजरा कर या सिनेमात काम केले आहे.