​केवळ तीन मिनिटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 15:41 IST2016-09-22T10:11:17+5:302016-09-22T15:41:17+5:30

खरे तर टू व्हिलर चालवण्याचे प्रशिक्षण घ्यायला अनेक दिवस लागतात. पण क्रिस्टल डिसोझा केवळ तीन मिनिटांत स्कूटी चालवायला शिकलीय. ...

Only three minutes | ​केवळ तीन मिनिटे

​केवळ तीन मिनिटे

े तर टू व्हिलर चालवण्याचे प्रशिक्षण घ्यायला अनेक दिवस लागतात. पण क्रिस्टल डिसोझा केवळ तीन मिनिटांत स्कूटी चालवायला शिकलीय. ब्रम्हराक्षस या मालिकेतील एका दृश्यात क्रिस्टलला स्कूटी चालायची होती. पण तिने कधीच टू व्हिलर चालवली नसल्याने सगळ्यांसमोर आता काय करायचे हा प्रश्न उभा राहिला. या दृश्यासाठी ड्युप्लिकेटचा वापर करावा असे टीममधील मंडळींचे म्हणणे होते. पण हे दृश्य स्वतःच करण्याचे क्रिस्टिनाने ठरवले. कधीही स्कूटी चालवली नसतानाही तिने तिच्या मालिकेचे दिग्दर्शक रंजन सिंह यांच्याकडून केवळ तीन मिनिटांत स्कूटी चालवायला शिकली. याविषयी क्रिस्टिना सांगते, "मी अनेक वर्षं सायकल चालवली असल्याने बॅलन्स करणे माझ्यासाठी कठीण नव्हते. त्यामुळे मी लगेचच स्कूटी चालवणे शिकू शकले. मी इतक्या कमी वेळात स्कूटी शिकून चित्रीकरण केल्यानंतर सगळ्याच टीमला आश्चर्याचा धक्का बसला होता." 

Web Title: Only three minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.