एक था राजी एक थी राणी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 15:39 IST2017-07-03T10:09:34+5:302017-07-03T15:39:34+5:30
भारतातील शाही घराण्यांमध्ये 1940च्या दशकात असणाऱ्या आशा-आकांक्षा, त्यांची जीवनशैली, असुरक्षितता, गूढता यांचे चित्रण करणारी एक था राजा एक थी ...
एक था राजी एक थी राणी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
भ रतातील शाही घराण्यांमध्ये 1940च्या दशकात असणाऱ्या आशा-आकांक्षा, त्यांची जीवनशैली, असुरक्षितता, गूढता यांचे चित्रण करणारी एक था राजा एक थी राणी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना 1950 पासून ते 1980 पर्यंतचा काळ पाहायला मिळाला होता. 60-70च्या दशकात खालसा झालेल्या राजघराण्याच्या वंशजांच्या प्रेमकथा आणि त्यांच्या जीवनाचे घडवलेले दर्शन यामुळे प्रेक्षकांना ही मालिका खूपच आवडली. या मालिकेचे नुकतेच 500 भाग पूर्ण झाले आहेत. आता 500 भागांनंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेली दोन वर्षं ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांना 4 जुलैला पाहायला मिळणार आहे.
एक था राजा एक थी राणी या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण नुकतेच झाले. त्यावेळी सगळ्या टीमने जड अंतकरणाने एकमेकांना निरोप घेतला. या मालिकेत नायक-नायिकेची भूमिका साकारणाऱ्या सरताज गिल आणि आयशा सिंगने मालिकेच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. तसेच त्यांनी चित्रीकरणाच्या वेळेच्या आठवणी शेअर केल्या. ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असतानाच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
अनिता राज, सुरेखा सिक्री, दृष्टी धामी, सिद्धांत कर्णिक यांसारख्या दिग्गज कलाकारांनी या मालिकेच्या पहिल्या आवृत्तीत भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर या मालिकेत लीप घेण्यात आली होती. लीपनंतर आयशा सिंग आणि सरताज गिल प्रमुख भूमिकेत दिसले होते. आयशा आणि सरताज सांगतात, प्रेक्षकांनी आम्हाला आजवर दिलेल्या प्रेमासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आमच्या सगळ्यांचे बाँडिंग खूप चांगले होते. आम्ही सगळेच एकमेकांना खूप मिस करणार आहोत.