OMG 'चाहुल' मालिकेत अवतरला खराखुरा सरडा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2016 16:33 IST2016-11-28T13:16:58+5:302016-11-28T16:33:11+5:30
होय, आजपर्यंत आपण मालिकेच्या प्रोमोशूटसाठी एखाद्या कलाकराची हटके स्टाइल एंट्री पाहिली आहे. मात्र चक्क शूटिंगसाठी खराखुरा सरड्याची एंट्री झालेली ...

OMG 'चाहुल' मालिकेत अवतरला खराखुरा सरडा ?
ह य, आजपर्यंत आपण मालिकेच्या प्रोमोशूटसाठी एखाद्या कलाकराची हटके स्टाइल एंट्री पाहिली आहे. मात्र चक्क शूटिंगसाठी खराखुरा सरड्याची एंट्री झालेली कधी पाहिली नाहीय. ही बातमी वाचून थोडे आश्चर्य वाटले असणारच,मात्र हे खरंय,चाहुल मालिकेत लवकरच एक इटरेस्टींग ट्रॅक पाहायला मिळणार आहे.मालिका इंटरेस्टींग होण्यासाठी नाना शक्कल वापरण्यात आल्या. शेवटी मालिकेत होणाऱ्या अघटित घटनेचे संकेत देण्यासाठी सरड्याची एंट्री करण्याचे ठरले. सरडा येणार आणि पुढे होणा-या घटनेचे संकेत देणार असे मालिकेची कथा रंगणार आहे. या स्पेशल भागाच्या प्रोमोसाठी सरडाची एंट्री करण्यात आलीय. सध्या टीव्हीवर झळकत असलेल्या प्रोमोमध्ये सरडा रस्ता क्रॉस करताना दिसतोय. त्यामुळे सध्या कलाकरांपेक्षा जास्त फोकस होणा-या सरड्याच्या एंट्री मागे रहस्य काय आहे असे अनेक प्रश्न रसिकांना पडले होते. त्यामुळे जेव्हा हा भाग टीव्हीवर झळकेल तेव्हा त्यांना सरड्याची नेमकी भूमिकेचा उलगडा होणार असल्याचे मालिकेच्या टीमने सांगितले आहे.त्यामुळे येणा-या भागात सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. मात्र सध्या कलाकरांमध्ये आकर्षणाचा विषय बनला आहे तो मालिकेत एंट्री करणा-या सरड्याची. विशेष म्हणजे मालिकेच्या सेटवर एखाद्या कलाकराप्रमाणेच या सरड्याची विशेष काळजीही मालिकेच्या टीमकडून घेण्यात आली होती. त्याची खाण्यापिण्यापासून ते राहण्यापर्यंत खास काळजी घेण्यात आली होती.खास त्याच्यासाठी बनवण्यात आलेल्या बंद पेटीत त्याला ठेवण्यात आले होते. इतकेच नाहीतर शूट संपल्यानंतर त्याला हॉटेलमध्ये एका वातावनुकुलीत रूममध्ये ठेवण्यात आले होते.एका माणसाप्रमाणेच या सरड्याची विशेष काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे यावेळी कलाकारांपेक्षाही सरडा सा-यांचे आकर्षणाचा विषय बनला आहे. सरड्याचा स्पेशल ट्रॅक हा ड्रोनने शूट करण्यात आला आहे.सेटवर सरड्याला अतिशय थाटात ठेवण्यात आले होते. यासाठी पेटा संस्थेकडून रितशीर परगवानगीही घेण्यात आली होती. कलाकाराप्रमाणेच त्याची सरड्याची भूमिकाही या प्रोमोमध्ये अगदी महत्त्वाची आहे.सरडा प्रोमोच्या शेवटी येतो आणि काहीतरी अघटीततेची चाहुल देऊन जातो.