OMG : कपिल शर्माच्या शो घेणार प्रेक्षकांचा निरोप?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2017 06:41 AM2017-07-24T06:41:23+5:302017-07-24T12:12:06+5:30

घर फिरल की घराचे वासे ही फिरतात असाच काहीस प्रकरा सध्या कपिल शर्माच्याबातीत झाला आहे. कपिलचा सुनील ग्रोवरशी झालेले ...

OMG: Kapil Sharma's show will take away the audience? | OMG : कपिल शर्माच्या शो घेणार प्रेक्षकांचा निरोप?

OMG : कपिल शर्माच्या शो घेणार प्रेक्षकांचा निरोप?

googlenewsNext
फिरल की घराचे वासे ही फिरतात असाच काहीस प्रकरा सध्या कपिल शर्माच्याबातीत झाला आहे. कपिलचा सुनील ग्रोवरशी झालेले वाद त्याला चांगलाच महागात पडला आहे. कपिलच्या शोची ढासळलेली टीआरपी काही केल्या वाढायचे नाव घेत नाही आहे. गेल्या 2 महिन्यात कपिलच्या शर्माच्या शोचे शूटिंग अनेक वेळा रद्द करावे लागले आहे. अचानक शो चे शूटिंग सुरु असताना वारंवार कपिलची तब्येत अचनाक बिघडते. गेल्या आठवड्यात कपिलचा शो कॉमेडी शोच्या  टॉप 10 लिस्टमध्ये ही जागा बनवू शकला नाही. त्यामुळे कपिलच्या मागचे शुक्लकाष्ट संपल्या संपत नाही आहे. कपिलचे आजारपण आणि शोची ढासळती टीआरपी बघता चॅनेलने कपिल सोबतचे करार न वाढवण्याचा विचार केला असल्याचे समजते आहे. कपिलचे करार एप्रिलमध्ये वाढवण्यात येणार होते मात्र तो अजनूही वाढवण्यात आलेला नाही.

ALSO READ : सेटवरच बेशुद्ध पडला कपिल शर्मा; रुग्णालयात उपचार सुरू! 
  
गेल्या आठवड्यात कपिलच्या सेटवर मुबारकांची टीम आली होती मात्र शूटिंग न करताच त्यांना परतावे लागले. त्यामुळे शनिवारी द कपिल शर्मा शोचा जुना एपिसोड टेलिकास्ट करण्यात आला. मुबारकांची टीम जेव्हा कपिलच्या सेटवर पोहोचली त्यावेळी त्यांना कपिलची तब्येत ठिक नसल्याचे सांगण्यात आले. तब्बल 4 तास वाट बघितल्यानंतर अनिल कपूर आणि अर्जुन कपूर यांनी सेटवरुन शूटिंग न करताच निघून जाण्याचा निर्णय घेतला. या आधी शाहरुख खान आणि अनुष्का शर्मालासुद्धा हॅरी मैट सेजलच्या प्रमोशनच्या वेळी शूटिंग न करताच  परतावे लागले होते. गेल्या 1 महिन्यात 3 वेळा शूटिंगदरम्यान कपिल आजार पडला आहे. ज्यामुळे शोचे शूटिंग कॅन्सल करावे लागले होते. त्यामुळे चॅनेलने हा निर्णय घेतल्याचे समजते आहे,  

Web Title: OMG: Kapil Sharma's show will take away the audience?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.