OMG : ​कपिल शर्मा आणि भारतीची जमली गट्टी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 18:38 IST2017-07-01T13:08:51+5:302017-07-01T18:38:51+5:30

सोनी टीव्हीच्या 'कपील शर्मा शो'च्या शूटींगला भारती सिंगने राम राम ठोकल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र भारतीने नुकताच इन्स्टाग्रमवरुन याचा ...

OMG: Kapil Sharma and Bharti's rally! | OMG : ​कपिल शर्मा आणि भारतीची जमली गट्टी !

OMG : ​कपिल शर्मा आणि भारतीची जमली गट्टी !

नी टीव्हीच्या 'कपील शर्मा शो'च्या शूटींगला भारती सिंगने राम राम ठोकल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र भारतीने नुकताच इन्स्टाग्रमवरुन याचा खुलासा केला असून लोकप्रिय 'द कपील शर्मा शो' जॉईन केल्याचे त्यात म्हटले आहे. या शोमध्ये कलाकारांना क्रिएटिव्ह फ्रिडम मिळत असल्याचेही तिचे म्हणणे आहे.
भारतीने कपीलसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ''कोण म्हणतंय मी 'कपील शर्मा शो'चे शूटींग करीत नाही ? '''
''मी आणि कपील मिळून मनोरंजन करावे असे प्रेक्षकांना वाटते,'' असेही तिने लिहिले आहे.
 'द कपील शर्मा शो'मधील दिवस फारच उत्साहवर्धक होता. मी यात 'बबली' ही पंजाबी व्यक्तीरेखा करीत आहे. ही दिल्लीतील एक लग्न जुळवणाऱ्या उर्मट व्यक्तीची भूमिका आहे. ती लोकांशी कशी बोलते, हाताळते हे पाहणे खूपच गंमतशीर आहे,'' असे भारतीने एका निवेदनात म्हटले आहे.
''शोबद्दल सांगायचे तर इथे कामाला खूप वाव आणि क्रिएटिव्ह फ्रिडम आहे. कपीलच्या टीमने माझा चांगला उपयोग करुन घेतला आहे. आणखी काही व्यक्तीरेखा साकारायला मी उत्सुक आहे,'' असेही ती म्हणते. भारतीची व्यक्तीरेखा असलेला एपिसोड रविवारी प्रसारित होईल.