OMG: चार्टर्ड अकाऊंटन्ट असलेली या अभिनेत्रीने लंडन सोडून गाठली मुंबई, झळकणार 'एक आस्था ऐसी भी' या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 14:47 IST2017-03-18T09:17:19+5:302017-03-18T14:47:19+5:30
धावणारी पळणारी मुंबई.... स्वप्न नगरी दुनिया.... ग्लॅमरस दुनिया असलेल्या मुंबईने आजवर अनेकांना आपल्या प्रेमात पाडले आहे.आयुष्यात हटके काही तरी ...
OMG: चार्टर्ड अकाऊंटन्ट असलेली या अभिनेत्रीने लंडन सोडून गाठली मुंबई, झळकणार 'एक आस्था ऐसी भी' या मालिकेत
ध वणारी पळणारी मुंबई.... स्वप्न नगरी दुनिया.... ग्लॅमरस दुनिया असलेल्या मुंबईने आजवर अनेकांना आपल्या प्रेमात पाडले आहे.आयुष्यात हटके काही तरी काम करायचे असेल तर मुंबईशिवाय पर्याय नाही.त्यामुळे डोळ्यांत स्वप्न घेवून अनेकांची पाऊले मुंबईकडे वळतात. अभिनेत्री बनण्यासाठी लंडनमधील टिना फिलिपलाही अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते. अभिनेत्री बण्यासाठी मुंबई तिला खुनावू लागली आणि त्यामुळे चक्क 'लंडन ठुमकदा' नाही तर 'मुंबई ठुमकदा' म्हणत ती थेट मुंबईत दाखल झाली.
अखेर मेहनतीला फळ हे मिळतेच ते टिना फिलिपनेही अनुभवले आणि मोठ्या संघर्षानंतर‘एक आस्था ऐसी भी’ ही नवी मालिकेतून तिचे कौशल्याने रसिकांचे मनोरंजन करताना छोट्या पडद्यावर झळकणार आहे.विशेष म्हणजे लंडनमधील मँचेस्टर शहरात चार्टर्ड अकाऊंटन्टचा व्यवसाय करणार-या टिनाला मनापासून अभिनयाची आवड होती. ही आवडच तिला लंडनवरून थेट मुंबईला घेऊन आली. आपल्या या प्रवासाबाबत टिना सांगते, “मला मनातून खरं तर अभिनेत्रीच व्हायचं होतं. मी तिकडे काही नाटकांतून भूमिकाही केल्या असल्या, तरी माझी खरी जागा मुंबईच आहे, हे मला जाणवत होतं.सुरुवातीला तिथला प्रस्थापित व्यवसाय सोडून मुंबईत स्थायिक होण्याच्या माझ्या निर्णयाला माझ्या आई-वडिलांनी विरोध केला खरा; पण इथे माझं मी व्यवस्थित बस्तान बसविल्याचं पाहिल्यावर त्यांचा सपोर्ट मिळाला. मालिकेत टिना आस्था ही भूमिका साकारणार आहे.या भूमिकेविषयी तिने सांगितले,“या मालिकेतली आस्था ही व्यक्तिरेखा मला मनोमन पटली आहे.आस्था आणि मी आम्ही दोघीजणी प्रामाणिक, निरागस आणि अडल्या-नडल्याच्या मदतीला धावणा-या आहोत.आस्था अतिशय नि:स्वार्थी असून नेहमी सदवर्तन करण्यावर तिचा कटाक्ष असतो.”या मालिकेत मानसी साळवी आणि विवेक मुश्रन यांच्यासारखे नावाजलेले कलाकार आहेत.