Ohhh: प्रिंस नरूला पडला युविकाच्या प्रेमात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 11:00 IST2017-02-28T05:30:46+5:302017-02-28T11:00:46+5:30
स्प्लिटसव्हीला,रोडीज आणि बिग बॉसचे 9वे पर्व जिंकल्यानंतर प्रिंस नरूला बधो बहु या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. रिअॅलिटी शोचे ...

Ohhh: प्रिंस नरूला पडला युविकाच्या प्रेमात?
स प्लिटसव्हीला,रोडीज आणि बिग बॉसचे 9वे पर्व जिंकल्यानंतर प्रिंस नरूला बधो बहु या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. रिअॅलिटी शोचे विजेते पद आपल्या नावावर करणारा प्रिंस नरूलाला रिअॅलिटी शोजचा किंग म्हणूनही ओळखले जाते.आपल्या कौशल्याने यश गाठणारा हा प्रिंस आता शोमुळे चर्चेत आलेला नाहीय, तर तो एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला असून टीव्ही अभिनेत्री युविका चौधरीला तो डेट करत असल्याचे कळतंय.याविषयी प्रिंसने सांगितले की, नक्कीच माझ्याविषयीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतीलच,आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही दोघेही आमच्या करिअरमध्ये खूप बिझी आहोत.आमच्या दोघांवर चित्रीत झालेले काही रोमँटीक सॉंगही तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील.या गाण्यांमध्येही आमच्या दोघांचा रोमान्स तुम्हाला नक्की आवडले अशी आशा आहे. त्यानंतर प्रिंसला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला, की तुम्ही दोघे एकमेकांना खूप प्रेम करता त्यामुळे,ही गुड न्युज तुम्ही तुमच्या रसिकांना कधी द्याल? या प्रश्नांवर प्रिंस हसला आणि म्हणाला की, कदाचित मी तुम्हाला या प्रश्चाचे उत्तर देऊ शकलो असतो.मी तिला प्रपोज केले असते आणि तिने माझ्या प्रेमाचा स्विकार केला असता तर नक्कीच माझी ही गुड न्युज मी सगळ्यांसह शेअर करू शकलो असतो. मात्र असे काहीही झालेले नसून आम्ही फक्त एक चांगले मित्र आहोत इतकेच काय ते सांगू शकतो.प्रिंससध्या 'बढो बहू' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तर युविकाने अस्तित्व एक प्रेम कहानी,डर सबको लगता है,ये वादा रहा, अम्मा यासारखे काही शोज मध्ये ती झळकली असून फिर भी दिल है हिंदुस्तानी,ओम शांती ओम,याराना यासारखे काही सिनेमाही युविकाने केले आहेत.