ओह,तर यांच्यामुळे मिळालीय पारूलला 'ही' भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 11:33 IST2016-12-08T11:33:20+5:302016-12-08T11:33:20+5:30

'बिदाई' या  हिंदी मालिकेने 8-9 वर्षापूर्वी सगळ्या रसिकांवर आपला एक वेगळा ठसा उमटवला होता. आजवर कधीही न पाहिलेला असा ...

Oh, but the role of 'Parameswara' is the role? | ओह,तर यांच्यामुळे मिळालीय पारूलला 'ही' भूमिका?

ओह,तर यांच्यामुळे मिळालीय पारूलला 'ही' भूमिका?

'
;बिदाई' या  हिंदी मालिकेने 8-9 वर्षापूर्वी सगळ्या रसिकांवर आपला एक वेगळा ठसा उमटवला होता. आजवर कधीही न पाहिलेला असा विषयाला हात घालत मालिकेनेही अल्पावधीतच रसिकांच्या मनावर मोहिनी घालायला सुरूवात केली होती. संध्या( सारा खान) आणि रागिणी(पारूल चौहान) या दोन बहिणीची विवाहाची कथा या मालिकेत मांडण्यात आली विशेष म्हणजे  आलोक नाथ यांनी वडिलांची भूमिकाही रसिकांना डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले होते. इतकी क्रेझ या मालिकेने 8 ते 9 वर्षापूर्वी निर्माण केली होती. आता याच मालिकेतील रागिणी म्हणजेच पारूल चौहानने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत कमबॅक केलेय.याच निमित्ताने पारूल चौहानशी साधलेला हा खास संवाद. 


'बिदाई' ते ‘यह रिश्ता क्या कहलाता है! या दोन्हीही लोकप्रिय मालिका तुला करायला मिळतेय?कारण मालिकेच्या टीमशी तुझे एक खास नाते आहे याविषयी जाणून घ्यायला आवडेल?
होय,खरंय ‘बिदाई’मालिकेमुळेच मला एक ओळख मिळाली.आजही लोकांना बिदाईची क्रेझ आहे मालिका येवून 8 ते 9 वर्ष झाली आहेत.त्यावेळची ती लोकप्रिय मालिका होती. आणि आता जेव्हा मी पुन्हा एखदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय ती ही एक सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. खूप कमी वेळा इकक्या चांगल्या टीमबरोबर काम करण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे या दोन्ही मालिकांचा एक समान वैशिष्ट्य आहे ते म्हणजे  मालिकेचे निर्माते राजन शाही.बिदाई मालिकाही त्यांनीच प्रोड्युस केली होती.त्यामुळे पुन्हा एकदा राजन शाही यांच्या टीमचा एक भाग बनायला मिळतंय. खरे सांगायला गेले तर तेच माझे गॉडफादर आहेत.आज मी जी काही आहे, ती केवळ त्यांच्यामुळेच आहे. मला या क्षेत्रात येऊन आठ-नऊ वर्षं झाली आहेत आणि आजही लोक मला 'रागिणी' म्हणूनच ओळखतात. त्याचा मला अभिमान वाटतो. ज्या दिवशी राजनसरांनी मला त्या भूमिकेसाठी बोलावलं आणि मी कोणताही प्रश्न न विचारता त्या भूमिकेला होकार दिला होता, तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही.विशेष म्हणजे आजही मी कुठे जाते लोक मला रागिणी म्हणून माझ्याशी भेटतात यावरूनच 'बिदाई'ची क्रेझ आजही शिल्लक आहे आणि ती केवळ राजनजींमुळेच आहे.

‘यह रिश्ता क्या कहलाता है!’ ही दीर्घकाळ चाललेली, परंतु आजही विलक्षण लोकप्रिय मालिका आहे. तू ती पूर्वी पाहिली होतीस का?
अर्थातच.ही मालिका आता जवळपास आठ वर्षं सुरू आहे. या मालिकेचा एक भाग बनता आलं, याबद्दल मला आनंद वाटतोय. ही एकच मालिका इतकी वर्षं सुरू असूनही ती आजही तितकीच लोकप्रिय आहे आणि प्रेक्षक या मालिकेला कंटाळलेले नाहीत, याचं कारण तिच्या कथेतील उत्कंठा आजही कायम ठेवण्यात निर्मात्यांना यश आलं आहे. त्यात नवी उपकथानकं तयार करण्यात आली आहेत. मी ही मालिका बारकाईने बघत असते आणि सार्‍्या कथानकांची नोंदही ठेवत असते.

'स्वर्ण गोएंका' तुझ्या  या व्यक्तिरेखेविषयी जाणून घ्यायला आवडेल?
मनीष गोएंका या धनाढ्य़ उद्योगपतीची स्वर्ण गोएंका ही पत्नी आहे. तिला कार्तिक, वरुण आणि कीर्ती अशी तीन मुलं आहेत. ती एक अतिशय शालीन स्त्री असून आपल्या कुटुंबियांना सर्व काही उत्कृष्ट तेच मिळावं, अशी तिची इच्छा असते. बिदाईनंतर मला पुन्हा एकदा संधी मिळालीय  याआधी प्रेक्षकांनी 'बिदाई' मालिकेतील 'रागिणी' या व्यक्तिरेखेला आपलं मानलं होतं. आता स्वर्ण गोएंकाबाबतही तसंच होईल, अशी माझी अपेक्षा आहे.

पुन्हा छोट्या पडद्यावर परतण्यासाठी इतका वेळ का घेतला?
माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मला लखनौला सारखी ये-जा करावी लागत होती. त्यानंतर मी माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर काही काळ परदेशात फिरून आले. मला नृत्य आणि पाककला किती आवडते, ते सर्वांनाच ठाऊक आहे.त्यामुळे मी नंतर विविध प्रकारच्या पाककृती बनवायला शिकले. त्यानंतर मी नियमित व्यायाम, योगा आणि झुम्बा सुरू केलं.त्यादरम्यान चांगल्या ऑफर्सचीही वाटा बघता होते नशीबाने ती अशी भूमिका मिळाली.

इतक्या वर्षांत तुला या क्षेत्रात कोणते बदल झालेले जाणवतात?
इतक्या वर्षांत खूपच बदल झाले आहेत. पूर्वी मी जेव्हा ‘बिदाई’ करीत होते, तेव्हा या क्षेत्रात फारसे कलाकार नव्हते.आता स्पर्धा खूपच तीव्र झाली आहे. तसंच हे क्षेत्रही ब-याच  अंशी सुधारले आहे. सध्या टीव्हीवर मालिकांचा सुकाळ झाला असून टीआरपीच्या अग्रस्थानी राहण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरू आहे. नवनवीन कथा, संकल्पना मालिकेत येत आहेत. परिणामी टीव्ही मालिका उद्योग हा आता खूपच उत्तम स्थितीत आहे, असं वाटतं.

Web Title: Oh, but the role of 'Parameswara' is the role?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.