​‘ओ फ्रीडा’ आता इजिप्तमध्ये रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 20:11 IST2016-04-03T03:11:32+5:302016-04-02T20:11:32+5:30

मेक्सिकन चित्रकर्तीचा प्रवास मांडणाºया ‘ओ फ्रीडा’ या मराठी प्रयोगाची निवड इजिप्तमधील एका नाट्यमहोत्सवासाठी झाली आहे. गेल्या दोनच वर्षा पासून ...

'O Freida' now playing in Egypt | ​‘ओ फ्रीडा’ आता इजिप्तमध्ये रंगणार

​‘ओ फ्रीडा’ आता इजिप्तमध्ये रंगणार

क्सिकन चित्रकर्तीचा प्रवास मांडणाºया ‘ओ फ्रीडा’ या मराठी प्रयोगाची निवड इजिप्तमधील एका नाट्यमहोत्सवासाठी झाली आहे. गेल्या दोनच वर्षा पासून सुरू झालेल्या या महोत्सवात जाणारं हे एकमेव आणि पहिलच मराठी नाटक आहे. 

मग्दालेना कार्मेन फ्रीडा, जी नंतर फ्रीडा काहलो या नावानं प्रसिद्ध झाली. तिच्या आठवणींचा पट या प्रयोगात उलगडतो. तिचा आत्माच जणू काही प्रेक्षकांशी संवाद साधतो. मेक्सिोकोतील फ्रीडाच्या घराचे म्हणजेच ‘द ब्लू हाऊस’चं रुपांतर आता संग्रहालयात करण्यात आलं आहे. 

इजिप्तमधील ‘अलेक्झांड्रिया इंटरनॅशनल फेस्टिव्हल फॉर कंटेम्पररी थिएटर’मध्ये या नाटकाची निवड झाली आहे. ७ एप्रिलला हा प्रयोग होईल. लेखक-दिग्दर्शक अभिषेक देशमुख आणि फ्रीडाच्या भूमिकेतील अभिनेत्री कृतिका देवशी सोलो थिएटर फेस्टिव्हलच्या निमित्ताने भेटले. स्त्री केंद्री एकपात्रीसाठी काही करावं या विचारात असतानाच अभिनेता शिवराज वायचळनं कृतिका व दिग्दर्शकांना मेक्सिकन चित्रकर्ती फ्रीडाविषयी सांगितले. तिच्या आयुष्याविषयी शोध घेताना ते गूढ आहे, ती एकटीच आयुष्यभर जगली, असं कृतिकाच्या लक्षात आले, आणि म्हणूनच हे नाटक योग्य वाटले.

Web Title: 'O Freida' now playing in Egypt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.