चांदनी आता बनणार दृष्ट ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 13:27 IST2016-06-10T07:57:54+5:302016-06-10T13:27:54+5:30
अभिनेत्री चांदनी भगनानी आता नव्या अवतारात रसिकांच्या भेटीला येतेय.'तुम ही बंधू सखा तुम ही' या मालिकेत सूनेची भूमिका साकारल्यानंतर ...
.jpg)
चांदनी आता बनणार दृष्ट ?
अ िनेत्री चांदनी भगनानी आता नव्या अवतारात रसिकांच्या भेटीला येतेय.'तुम ही बंधू सखा तुम ही' या मालिकेत सूनेची भूमिका साकारल्यानंतर चांदनी आता निगेटिव्ह भूमिका साकारणार आहे. 'एक था राजा, एक थी रानी' या मालिकेत चांदनी आता ग्रे शेडमध्ये दिसणार आहे. चांदनी यांत उद्धट आणि फारशी जाण नसलेल्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत स्वर्णलेखाचा मृत्यू झाला असून तिची लेक आता तिची जागा घेते असं कथानक पुढे नेण्यात येईल. त्यामुळं संतोषी माता, 'तुम ही बंधू सखा तुम ही' या मालिकेतील चांदनी ही आव्हानात्मक भूमिका कशी साकारते याकडं फॅन्सच्या नजरा लागल्यात.