चित्रपटातील एखादे गाणे गाजले कि तो चित्रपट सुपरहिट झाला म्हणुनच समजा. असे किती ...
अवधुत म्हणतोय आता पाठ करा
/> चित्रपटातील एखादे गाणे गाजले कि तो चित्रपट सुपरहिट झाला म्हणुनच समजा. असे किती तरी चित्रपट आहेत जे फक्त गाण्यांमुळे हिट झाले आहेत. बॉलीवुडप्रमाणे आता मराठीतही अनेक धडाकेबाज अन भन्नाट शब्द असलेली गाणी आली आहेत. अशा प्रकारच्या गाण्यांना आजची तरुणाई डोक्यावर घेताना दिसते. बरेचदा गाण्यांचे शब्द काय आहेत हे समजतच नसते तरी देखील ते गाणे आपल्याला आवडते. म्हणुनच आता अवधुत गुप्ते म्हणतोय पाठ करा. अवधुत शाहरुखच्या चित्रपटातील जबरा फॅन गाणे गात आहे आणि हे गाणे आता त्याच्या शब्हांसहीत यु ट्युब वर अवेलेबल झाले आहे. ज्या प्रेक्षकांना या गाण्याचे शब्द समजले नव्हते त्यांच्यासाठी खास मराठी सबटायटल्स मधील व्हीडीओ आला आहे. आता शाहरुखच्या जबरा फॅन्सना या लिरीक्स मुळे आनंद तर झालाच असणार ना.