आता कृष्णा अभिषेक सुरू करणार ड्रामा कंपनी?वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 14:12 IST2017-06-28T08:25:11+5:302017-06-28T14:12:53+5:30

'कपिल शर्मा'प्रमाणेच आता काही कॉमेडियन आपापले एक कॉमेडी शो आणण्यास सज्ज झाले आहेत.कॉमेडियन कृष्णा अभिषेक 'ड्रामा कंपनी' या नावाने ...

Now Krishna Abhishek will start the Drama company. Read the details | आता कृष्णा अभिषेक सुरू करणार ड्रामा कंपनी?वाचा सविस्तर

आता कृष्णा अभिषेक सुरू करणार ड्रामा कंपनी?वाचा सविस्तर

'
;कपिल शर्मा'प्रमाणेच आता काही कॉमेडियन आपापले एक कॉमेडी शो आणण्यास सज्ज झाले आहेत.कॉमेडियन कृष्णा अभिषेक 'ड्रामा कंपनी' या नावाने नवा शो आणण्याच्या तयारीत आहे. या शोमध्ये कृष्णाबरोबर मिथुन चक्रवर्ती, सुगंधा मिश्रा,अली असगर,रिद्दिमा पंडित, संकेत भोसले आणि सुदेश लहरी रसिकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. नुकताच या शोचा प्रोमो शूट करण्यात आला असून सुगंधाने प्रोमोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा शो सोनी चॅनलवर प्रसारित होणार असल्यामुळे 'सबसे बडा कलाकार' या शोला हा शो रिप्लेस करणार असल्याचे कळतंय.विशेष म्हणजे कृष्णाचा नवीन शो पाहण्यासाठी रसिकांना जास्त दिवस वाट पहावी लागणार नसून जुलैच्या पहिल्या आठवड्यातच रसिकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळतेय.अभिनेते मिथुन चक्रवर्ती कृष्णाच्या शोमध्ये जजच्या भूमिकेत झळकतील. लवकरच या शोचे प्रोमोही टीव्हीवर झळकणार आहेत.सध्या तरी सुगंधाच्या या फोटोवरूनच शोविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरीही हा शो कपिल शर्माच्या शोपेक्षा वेगळा असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.सुंगधाने तिच्या फेसबुक पेजवर शेअर केलेल्या फोटोंना पाहून सुगंधाच्या अनेक चाहत्यांनी या शोमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करून घेण्यात याव्या याविषयी काही खास टीप्सही दिल्याचे पाहायला मिळतंय.कपिल शर्माला हा शो मागे टाकणार असल्याचे कलाकारांना विश्वास असल्यामुळे फुल ऑन ही मंडळी मेहनत करतायेत.रसिकांनाही त्याच त्या गोष्टी पाहण्यात आता रस उरला नाहीय,त्यामुळे हटके कंसेप्ट या नवीन शोमध्ये पाहायला मिळणार असल्याचे सुगंधाने सांगितले.शोसाठी प्रोमोशूटमध्ये कृष्णा अभिषेकपासून ते सुगंधा मिश्रापर्यंत सगळ्यांच्या चेह-यावर एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय.त्यामुळे आता नवीन रंगात, नवीन ढंगात सुरू होणारा हा शो रसिकांच्या पसंतीस पात्र ठरणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे. 



Web Title: Now Krishna Abhishek will start the Drama company. Read the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.